मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना चालक पडला ४० फूट खोल चेंबरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 07:07 PM2022-11-16T19:07:45+5:302022-11-16T19:10:02+5:30

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर किमी ४२/४०० जवळ मंगळवारी रात्री आठच्या सुमारास हा विचित्र अपघात घडला...

While crossing the road on the Mumbai-Pune Expressway, the driver fell into a 40 feet deep chamber | मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना चालक पडला ४० फूट खोल चेंबरमध्ये

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना चालक पडला ४० फूट खोल चेंबरमध्ये

Next

लोणावळा (पुणे) :मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना रात्रीच्या वेळी एक टेम्पोचालक चेंबरचा अंदाज न आल्याने अंधारात अचानक त्या चेंबरमध्ये पडला. चेंबर साधारणतः ४० फूट खोल होते. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून चालक बचावला. मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर किमी ४२/४०० जवळ मंगळवारी रात्री आठच्या सुमारास हा विचित्र अपघात घडला.

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाने पुण्याकडून मुंबईकडे जाणारा आयशर टेम्पो खंडाळा भागातील किमी ४२/४०० जवळ आला असता गाडीमधील डिझेल संपल्याने तो बंद पडला. टेम्पोचालक फोनवर मदतीसाठी संपर्क करत असताना त्याच्या फोनची बॅटरीही संपली. त्या दरम्यान विरुद्ध दिशेला पुण्याकडे जाणारा एक ट्रक उभा होता. त्या ट्रकमध्ये मोबाइल चार्जिंग करण्यासाठी हा चालक रस्ता क्रॉस करत होता. त्यावेळी रस्त्याच्या मधोमध असलेले चेंबर अंधारामुळे त्याच्या लक्षात आले नाही. आणि क्रॉस करताना अचानक त्या चेंबरमध्ये तो कोसळला.

चेंबर साधारणत: ४० फूट खोल होते. ध्यानीमनी नसताना कोसळल्यामुळे त्याने घाबरून जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. पलीकडे बंद असलेल्या गाडीतील चालकाला त्याचा आवाज ऐकू आला. त्याने आवाजाचा अंदाज घेतला असता त्याला तो चालक चेंबरमध्ये पडल्याचे लक्षात आले. परिस्थिती बिकट होती म्हणून त्या चालकाने समयसूचकतेने पोलिस हेल्पलाइनवर फोन केला. पोलिस हेल्पलाइनवरून माहिती मिळाल्यावर बोरघाट वाहतूक पोलिस, देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, लोकमान्य हॉस्पिटल, मृत्युंजय देवदूत, खोपोली पोलिस आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे टीम मेंबर स्पॉटवर दाखल झाले.

देवदूतच्या टीमने खाली जाऊन अंदाज घेतला असता चालक गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्याला धीर देत त्यांनी स्ट्रेचरला रोपने बांधले आणि नंतर सर्वांनी त्या खोल चेंबरमधून चालकाला वर काढले. एवढ्या उंची वरून पडल्यामुळे ड्रायव्हरचे हात, पाय आणि कंबर मेजर फ्रॅक्चर झाल्याची शक्यता असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथे हलवण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक हरीश काळसेकर हे या अपघातातील पुढील कारवाई करत आहेत.

Web Title: While crossing the road on the Mumbai-Pune Expressway, the driver fell into a 40 feet deep chamber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.