पुणे : चार हजार रुपयांची लाच घेताना तलाठी ACB च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 08:46 PM2022-06-07T20:46:08+5:302022-06-07T20:50:02+5:30
राजगुरूनगर येथील कार्यालयात मंगळवारी लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडले...
राजगुरुनगर: सातबारावरील नोंद घालण्यासाठी शेतकऱ्याकडून ४ हजार रुपयांची रक्कम घेताना खेड तालुक्यातील वाडा विभागाच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजगुरूनगर येथील कार्यालयात मंगळवारी (दि ७) रंगेहात पकडले. सुजित सुधाकर अमोलिक (वय ५० ) असे तलाठ्याचे नाव आहे.
तालुक्यातील प्रश्चिम भागातील वाळद येथील जमीन खरेदी विक्री नंतर होणाऱ्या नोंदी घालण्यासाठी एका स्थानिक शेतकऱ्याकडून तलाठी सुजित अमोलिक यांनी पाच रुपये मागितले होते. नोंद घालण्यात आली. मात्र ठरलेल्या पैकी उर्वरित पाच हजार रुपये द्यावेत म्हणून तलाठी शेतकऱ्याला फोन करून त्रास देत होते. पैसे न दिल्यास घातलेली नोंद रद्द करू अशी धमकी पण देत होते.
अखेर शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. प्लॅन झाल्यावर मंगळवारी ही रक्कम देण्यासाठी शेतकरी राजगुरूनगर येथे कार्यालयात तलाठी यांने शेतकऱ्याकडून ही रक्कम स्वीकारली ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरिक्षक ज्योती पाटील यांनी केली. खेड तालुक्यातील गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. दोन महिन्यांपूर्वी एका तलाठ्याला किरकोळ रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.