सांगवी पोलीस ठाण्यात वीस हजारांची लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 00:29 IST2020-12-22T00:28:18+5:302020-12-22T00:29:05+5:30
पोलीस बंदोबस्त पुरवण्यासाठी मागितली लाच

सांगवी पोलीस ठाण्यात वीस हजारांची लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडले
पिंपरी : पोलीस बंदोबस्त पुरवण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्यात वीस हजारांची लाच घेताना एका सहायक फौजदारास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. २१) रात्री ही कारवाई केली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या एका सहायक फौजदाराने बंदोबस्त पुरविण्यासाठी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास याबाबत माहिती दिली. त्यानुसार सापळा रचला. सहायक फौजदारास वीस हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी आणखी एका पोलीस अधिकाऱ्याच्या सहभागाबाबत चौकशी सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.