शिरूरमध्ये ५ हजारांची लाच घेताना भूकरमापकाला रंगेहाथ पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 07:08 PM2021-08-31T19:08:07+5:302021-08-31T19:08:19+5:30

लाचलुपत प्रतिबंधक कायद्यानुसार शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

While taking a bribe of Rs 5,000 in Shirur, a land surveyor was caught red handed | शिरूरमध्ये ५ हजारांची लाच घेताना भूकरमापकाला रंगेहाथ पकडला

शिरूरमध्ये ५ हजारांची लाच घेताना भूकरमापकाला रंगेहाथ पकडला

Next
ठळक मुद्देलाच लचुपत प्रतिबंधक पथकाने सोमवारीच कार्यालयाच्या आवारात लावला होता सापळा

पुणे : जमिनीची मोजणी करुन देण्याचा माेबदला म्हणून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शिरुर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका भूकरपाकाला रंगेहाथ पकडले.

प्रशांत मोहन कांबळे (भूकरमापक वर्ग ३) असे लाचखोर कर्मचार्याचे नाव आहे. ही कारवाई शिरुर येथील भूमी अभिलेखाच्या कार्यालयाच्या आवारात पथकाने केली आहे.

याबाबत एका ५३ वर्षाच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या जमीनीची मोजणी करण्यासाठी शिरुर येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी प्रशांत कांबळे याने त्यांच्याकडे जमीन मोजणी करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची मोबदला म्हणून मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचत विभागाकडे तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीची सोमवारी पडताळणी केली असता, कांबळे याने लाच मागितल्याचे समोर आले.

त्यानुसार लाच लचुपत प्रतिबंधक पथकाने सोमवारीच कार्यालयाच्या आवारात सापळा लावला होता. त्यावेळी ५ हजाराची लाच घेताना कांबळेला पकडले. याप्रकरणी कांबळे याच्या विरुद्ध लाचलुपत प्रतिबंधक कायद्यानुसार शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत

Web Title: While taking a bribe of Rs 5,000 in Shirur, a land surveyor was caught red handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.