Pune | राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यात कोरोना लसीचा तुटवडा

By राजू हिंगे | Published: April 4, 2023 06:07 PM2023-04-04T18:07:18+5:302023-04-04T18:10:02+5:30

कोरोनाच्या लसीसाठी पुणेकरांना किमान आठ दिवस वाट पहावी लागणार आहे...

While the number of corona patients is increasing in the state, there is a shortage of corona vaccine in Pune | Pune | राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यात कोरोना लसीचा तुटवडा

Pune | राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यात कोरोना लसीचा तुटवडा

googlenewsNext

पुणे : पुण्यासह राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालय, कमला नेहरु, सुतार दवाखाना यासारख्या रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या लसीसाठी पुणेकरांना किमान आठ दिवस वाट पहावी लागणार आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आलेख घसरला होता. पण, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने वेग पकडला आहे. गेल्या पाच आठवड्यात देशातील कोरोना संसर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंत्रालयाने राज्यांना कोविडचा सामना करण्यासाठी चार टी म्हणजेच टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-टीकाकरण (लसीकरण) करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत. घाबरु नका, खबरदारी बाळगा, कोरोनाचा वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगाने केलं आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. 

पुण्यासह राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यात मात्र लसीकरण बंद असल्याने नागरिकांना मात्र सहन करावा लागत आहे. पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात सध्या लसी उपलब्ध नसल्यामुळे हे लसीकरण थांबवले आहे. पालिकेच्या दवाखान्यामध्ये एक एप्रिलपासून लस उपलब्ध नाही. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला माोफत पुणे महापालिकेला लस उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या दवाखान्यामध्ये लस येण्यासाठी आठ दिवसांची वाट पहावी लागेल अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली.

Web Title: While the number of corona patients is increasing in the state, there is a shortage of corona vaccine in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.