अंगावर पांढरे कपडे, तशीच दाढी; पाहा पुण्यातील एकनाथ शिंदे काय म्हणतायेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 06:19 PM2022-08-01T18:19:15+5:302022-08-01T18:19:40+5:30

पुण्यात हुबेहूब शिंदेसारखे दिसणाऱ्या या व्यक्तीशी लोकमतने संवाद साधला

White clothes on the body the same beard See what Eknath Shinde from Pune has to say | अंगावर पांढरे कपडे, तशीच दाढी; पाहा पुण्यातील एकनाथ शिंदे काय म्हणतायेत...

अंगावर पांढरे कपडे, तशीच दाढी; पाहा पुण्यातील एकनाथ शिंदे काय म्हणतायेत...

googlenewsNext

पुणे : रिक्षा व्यवसाय ते मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास करणारे एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत युती केली. आणि मुख्यमंत्री पदाचा मान मिळवला आहे. एक सामान्य राजकीय कार्यकर्त्या मुख्यमंत्री झाल्याने एकनाथ शिंदेंची जोरदार चर्चा सुरु आहे. महिनाभरातच राज्यातील महत्वाचे निर्णय घेण्याबरोबरच जिल्ह्यांचे दौरेही त्यांनी सुरु केले आहेत. महाराष्ट्रातील घराघरात एकनाथ शिंदे चर्चेत येऊ लागले आहेत. त्यातच पुण्यात हुबेहुब एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसणाऱ्या एका व्यक्तीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सारसबागेजवळील अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात हुबेहूब शिंदेसारखं दिसणाऱ्या या व्यक्तीशी लोकमतने संवाद साधला. विजय माने असे या व्यक्तीचे नाव आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे वाढलेली दाढी, अंगावर पांढरे कपडे, कपाळी टिळा त्याप्रमाणेच विजय माने यांचे व्यक्तिमत्व दिसून येत आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून विजय मानेंची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कार्यक्रमात त्यांच्याबरॊबर नागरिक फोटो काढताना दिसून आले.             
 
विजय माने म्हणाले, मी आधीपासूनच असाच दिसतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक लोक म्हणायला लागली तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसत आहात. काही जण म्हणाले पांढरे कपडे घाला. नंतर ते माझ्याबरोबर फोटो काढू लागले. तेव्हा लोकांना एकनाथ शिंदे यांच्यासोबतच थांबलोय असेही वाटू लागले. सामान्य लोकांना माझ्याबरोबर फोटो काढून एकनाथ शिंदेसोबाबत फोटो काढल्याचा आनंद मिळत आहे. हा अनुभव मला आनंदी वाटतो.   

Web Title: White clothes on the body the same beard See what Eknath Shinde from Pune has to say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.