हंजर कचरा प्रकल्प ठरणार पांढरा हत्ती?
By admin | Published: May 12, 2014 02:37 AM2014-05-12T02:37:58+5:302014-05-12T02:37:58+5:30
शहरातील कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी उरुळी देवाची येथील हंजर प्रकल्पाची वीजजोडणी कायम ठेवण्यासाठी महापालिकेस पदरमोड करावी लागण्याची शक्यता आहे.
पुणे : शहरातील कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी उरुळी देवाची येथील हंजर प्रकल्पाची वीजजोडणी कायम ठेवण्यासाठी महापालिकेस पदरमोड करावी लागण्याची शक्यता आहे. स्थायी समितीने या प्रकल्पाची २५ लाख रुपयांची थकबाकी भरण्यासाठी १५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली असून, प्रकल्प व्यवस्थापनाने हे बिल भरण्यास असमर्थता दर्शविल्याने हे बिल महापालिका भरण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णय उद्या (सोमवार) अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार्या प्रकल्प व्यवस्थापनाच्या बैठकीत होईल. शहरात दररोज निर्माण होणार्या सुमारे १४०० ते १५०० टन कचर्यातील तब्बल १ हजार टन कचर्यावर प्रक्रिया करण्यात येते. मात्र, गेल्या ६ महिन्यांपासून या प्रकल्पाची क्षमता ६०० टनांपर्यंतच सुरू आहे. गेल्या वर्षभरात लाखो रुपयांचे वीजबिल थकल्याने २ ते ३ वेळा वीजपुरवठा खंडित केला होता. प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास शहरात कचराकोंडी निर्माण झाली होती. प्रकल्पाचे सुमारे २५ लाख रुपयांचे वीजबिल थकले असून, १५ मेपूर्वी बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. (प्रतिनिधी)