गतिरोधकांना पांढरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:11 AM2021-02-12T04:11:17+5:302021-02-12T04:11:17+5:30
उंडवडी कडेपठार : उंडवडी कडेपठार येथे अपघात टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गतिरोधकच अपघाताचे कारण बनत आहेत. या गतिरोधकांची ...
उंडवडी कडेपठार :
उंडवडी कडेपठार येथे अपघात टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गतिरोधकच अपघाताचे कारण बनत आहेत. या गतिरोधकांची माहिती देणारे फलक तसेच गतिरोधकांना परावर्तीत पांढरे पट्टे न लावल्याने वाहनचालकांना याचा अंदाज येत नाही. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते, रस्ते विकास प्राधिकरण तसेच वाहतूक विभागानेही याकडे दुर्लक्ष केले असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. गतिरोधकांची माहिती देणारा पुढे गतिरोधक आहे, असा फलक रस्त्यावर असणे गरजेचे आहे. मात्र, बांधकाम विभागातर्फे हे फलक लावण्यात आलेले नाहीत. रस्त्यावरून जाताना अचानक जवळ आल्यावर गतिरोधक असल्याचे कळत असल्याने ब्रेक दाबण्याच्या नादात वाहनावरील ताबा सुटून अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी तर हे गतिरोधक लक्षातही येत नाहीत. यामुळे वारंवार अपघात होत आहेत. परिणामी या ठिकाणी फलक लावावे आणि पांढरे पट्टे मारण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.