पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात आलेले संशयित नक्की कोण? पोलिसांकडून प्राथमिक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 01:29 PM2024-08-14T13:29:16+5:302024-08-14T13:30:08+5:30

काही स्थानिकांनी या तरूणांचे फोटो काल समाजमाध्यमांवर बांग्लादेशी म्हणून टाकून खोटा मेसेज पसरवला होता, पोलिसांची माहिती

Who exactly is the suspect who came to Pune's Kamla Nehru Hospital? Preliminary information from the police | पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात आलेले संशयित नक्की कोण? पोलिसांकडून प्राथमिक माहिती समोर

पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात आलेले संशयित नक्की कोण? पोलिसांकडून प्राथमिक माहिती समोर

पुणे: पुण्याच्या मंगळवार पेठेतील पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय येथे संशयित घुसल्याने मोठा गोंधळ सुरू झाला होता. सुरक्षारक्षकांनी तातडीने पाऊल उचलून या संशयिताना रूममध्ये बंद केले. यावेळी रुग्णालयातून सर्वांना बाहेर काढण्यात आले होते. पोलिसांनी त्या तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. हे तीन व्यक्ती दहशतवादी किंवा बांगलादेशी असल्याच्या संशय व्यक्त केला जात होता. परंतु हे दहशतवादी किंवा बांग्लादेशी असल्याच पोलिसांच्या प्राथमिक चौकशीच आढळून आलेल नाही असे पोलिसांनी सांगितले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेले तरूण पुण्यात लोहियानगर परिसरात वास्तव्याला आहेत. मूळचे बिहारचे असून त्यांच्याकडे आधारकार्ड मिळून आले आहेत. काही स्थानिकांनी या तरूणांचे फोटो काल समाजमाध्यमांवर बांग्लादेशी म्हणून टाकून खोटा मेसेज पसरवला होता. आज हे तरूण कमला नेहरू रूग्णालयात गेले असता समाजमाध्यमांवर फोटो बघितलेल्या सुरक्षारक्षकांनी पोलीस कंट्रोलला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस तिथे पोहोचले . तूर्तास ते दहशतवादी किंवा बांग्लादेशी असल्याच पोलिसांच्या प्राथमिक चौकशीच आढळून आलेल नाही. असे पोलिसांनी सांगितले आहे. 

आम्हाला ते संशयास्पद वाटले

काल एक फोटो मोबाइलवर व्हायरल झाला होता. त्यावरून आम्हाला त्यांच्यावर संशय आला. ते काल ब्लड टेस्ट करायला आले होते. तसेच रुग्णालयाबाहेर जाऊन फोटो काढून गेले. आम्हाला हे फारच संशयास्पद वाटलं. आज पुन्हा त्यांना आम्ही पाहिलं. मग त्यांना आम्ही रुग्णालयात स्थानबद्ध करून ठेवले. आम्ही कालपासून त्यांच्यावर नजर ठेवून होतो. आज पण ते ब्लड टेस्ट करायला आले. आम्ही लगेच त्यांना पकडून ठेवले. त्यांच्या बॅगमध्ये बिहारचे आधार कार्ड होते. तातडीने वरिष्ठांना कळवले. तसेच पोलिसांना फोन करून बोलावले. यावेळी आम्ही लोकांना बाहेर काढले. त्यांची वेशभूषा अफगाणी होती. त्यामुळे आम्ही घाबरलो होतो. पण आम्ही नागरिकांची, रुग्णांची सुरक्षा म्हणून तातडीने पाऊल उचलून रुग्णालय बंद केले असल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले. 

Web Title: Who exactly is the suspect who came to Pune's Kamla Nehru Hospital? Preliminary information from the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.