कुणी एटीएम देता का, एटीएम..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:03 AM2017-08-01T04:03:59+5:302017-08-01T04:03:59+5:30
वेळ दुपारी साडेबाराची. वाहतुकीचे नियम तोडणाºयावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलिस सज्ज. एका रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणाला पोलिसांनी जवळ बोलावले.
पुणे : वेळ दुपारी साडेबाराची. वाहतुकीचे नियम तोडणाºयावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलिस सज्ज. एका रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणाला पोलिसांनी जवळ बोलावले. तो काहीसा भांबावला. ‘कोणताही नियम तोडलेला नसतानाही पोलीस मला का हटकत आहेत?’ हेच त्याला समजेना. त्यांनी त्याच्याकडे एटीएम कार्ड मागितले. त्याला ‘कशासाठी?’ हेच कळेना. ‘अहो काय आहे ना, एका वाहनचालकाकडे एटीएम होते; पण त्याला अजून पासवर्ड न मिळाल्यामुळे तो २०० रुपये हातात ठेवून निघून गेलाय. आता हे पैसे तर आम्ही जमा करू शकत नाही; मग जरा तुमचे एटीएम कार्ड द्याल का? ते स्वाइप करतो, मग ही रक्कम तुम्हाला देतो.’ खूप विनंती केल्यानंतर तो तरुण तयार झाला. कुणाचे एटीएम त्या डिव्हाईसमध्ये चालत नाही; मग कधी स्वत:चे एटीएम स्वाइप करायचे, तर कधी कुणाकडे ‘एटीएम देता का, एटीएम?’ म्हणत हात पसरण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली आहे. दिवसाला अशा स्वरूपाच्या तीन ते चार केसेस घडत असल्याची आगतिकता पोलिसांनी व्यक्त केली.
वाहनचालकांना शिस्त लागावी आणि वाहतुकीचे नियम मोडणाºया वाहनचालकांकडून पोलिसांच्या होणाºया सेटलमेंटला आळा बसण्यासाठी वाहतूक शाखेने ‘ई-चलान’ उपक्रम सुरू केला खरा; मात्र त्या चांगल्या उपक्रमाचा फोलपणा आता समोर येऊ लागला आहे. शहरातील प्रत्येक चौकात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या हातात चलानचे डिव्हाईस देण्यात आले आहे. सिग्नल तोडला, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी केलेली दिसली, की दे ई-चलान. पण, हा उपक्रम म्हणजे पोलिसांना त्रासदायक ठरत अ ाहे.