...तो तोतया पोलीस अधिकारी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 11:19 PM2018-12-20T23:19:09+5:302018-12-20T23:19:51+5:30
कुरकुंभ औद्योगिक परिसरातील घटना; सत्यता पडताळून कारवाई करण्याची मागणी
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक परिसरात सध्या तोतया पोलीस अधिकारी फिरत असल्याची चर्चा सध्या सोशल मिडीयावर जोर धरत आहे. त्यामुळे हा बंदुकधारी तोतया स्वत:ला पोलीस अधिकारी म्हणून दिशाभूल करून त्रास देत असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत स्पष्ठपणे समोर येवून नाव सांगण्यास कोणीच तयार होत नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी याबाबत तपास करून तोतया पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून फिरणाऱ्या इसमाला अटक करण्याची मागणी ग्रामस्था करीत आहेत. त्याच्या जवळ असणाºया शस्त्र हे परवाना असलेले आहे किंव्हा नाही याची देखील माहिती मिळणे गरजेचे असून भविष्यात एखाद्या दुर्घटनेला कुरकुंभ ग्रामस्थांना सामोरे जावे लागणार आहे काय? असा प्रश्न सर्वसामन्य नागरिक विचारात आहेत.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र हे बेकायदेशीर व गुन्हेगारांना सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे. अनेक प्रकारच्या गुन्हेगारांनी या ठिकाणी आपले बस्थान बसवले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.मात्र याबाबत कोणीच प्रत्यक्ष समोर येवून उघडपणे बोलत नाही व पोलीस प्रशासन देखील स्वत:हून यात लक्ष घालत नसल्याने परिणामी बेकायदेशीर व्यवहार व गुन्हेगारीचे चांगलेच फावते आहे. अनेक ठिकाणी कंपनीतील कामासाठी स्थानिकांनी डावलून बाहेरील अश्या बाहुबली गुन्हेगारांना कामे दिली जातात यामध्ये कोणीच हस्तक्षेप करीत नाही व त्यामुळे स्थानिकांच्या हातातील घास हा दुसºयांच्या घशात का घातला जात आहे असा प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे.
कुरकुंभ औद्योगिक परिसरात सध्या विविध कामांच्या बाबतीत स्थानिकांनी पुढे येवून तक्रार करण्यास सुरुवात केली आहे.स्थानिक तरुणांना प्रत्यक्षात काम मिळत नसून बाहेरील आलेल्या काही राजकीय व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाºया बाहुबली व्यक्तींच्या माध्यमातून कामे मिळवण्याची वेळ आलेली आहे त्यातही काही अगदी जवळच्या संबंधितांनाच कामे दिली जात आहे.तर अनेक वेळा एखाद्या मोठ्या सरकारी अधिकाºयाची ओळखीच्या माध्यमातून कंपनीच्या मोठ्या अधिकाºयाकडे वशिला लावून कामे मिळवली जात आहेत याचा परिणाम प्रत्यक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या रोजगारीवर होत असून याबाबत अनेक वेळा तक्रारी करून देखील काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.
सध्या कुरकुंभ परिसरात अश्या घटनेतून औद्योगिक क्षेत्राची लुट केली जात असल्याची चर्चा उघडपणे होत आहे.मात्र हा संदिघ्न कोण आहे हे कोणीच सांगत नाही. कुरकुंभ परिसरात अनेकांनी स्व सरंक्षण म्हणून बंदुकीचा परवाना मिळवला आहे.मात्र यामधील सर्व स्थानिक असून त्यांना सर्वजण ओळखतात त्यामुळे अन्य कोणी बाहेरील व्यक्ती याठिकाणी येवून अश्या प्रकारच्या काही प्रकारात सामील होत आहे का याबाबत तपास होणे गरजेचे आहे.
तर ज्या नागरिकांना अश्या संशयीत इसमाबद्दल माहिती असल्यास पोलिसांना सांगणे गरजेचे आहे तसेच औद्योगिक क्षेत्रात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याची भूमिका पोलीस पाटील शितोळे यांनी मांडली.
कुरकुंभ औद्योगिक परिसरात अशा प्रकारे कोणी तोतया पोलीस अधिकारी कोणाला त्रास देत असेल तर त्यांनी त्वरीत पोलिसांना याबाबत कळवणे आवश्यक आहे.अशा प्रकारे फसवणूक करणाºयावर कारवाई केली जाईल.
- के. बि. शिंदे
पोलीस जमादार, कुरकुंभ