पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच १०० कोटींचं कॉन्ट्रॅक्ट घेणारा चहावाला कोण? किरीट सोमय्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 06:02 PM2022-02-11T18:02:09+5:302022-02-11T18:02:17+5:30

पुणे महापालिकेत आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच भाजपने जंगी स्वागत केलं

Who owns the 100 crore contract for Pune Municipal Corporation Jumbo Covid Center Question of Kirit Somaiya | पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच १०० कोटींचं कॉन्ट्रॅक्ट घेणारा चहावाला कोण? किरीट सोमय्यांचा सवाल

पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच १०० कोटींचं कॉन्ट्रॅक्ट घेणारा चहावाला कोण? किरीट सोमय्यांचा सवाल

Next

पुणे : पुणे महापालिकेत आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच भाजपने जंगी स्वागत केलं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी काही वेळ पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये महापालिका आवरात येताना राडा झाला. पुणे महापालिकेत भाजपकडून पुणे महापालिकेत शक्तीप्रदर्शन अन घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी गेल्या शनिवारी पुणे महापालिकेत किरीट सोमय्या यांच्यावर केला होता हल्ला त्यामध्ये ते जखमी झाले होते. किरीट सोमय्या यांच्यावर ज्या शिवसैनिकांनी ठिकाणी हल्ला केला त्याच ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्या याचा सत्कार केला. 

यावेळी सोमय्या म्हणाले,  पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच १०० कोटी कॉन्ट्रॅक्टर कोणाला दिलं त्या कंपनी मालकाच नाव उद्धव ठाकरे यांनी हिंमत असलं तर सांगाव. तो एक चहावाला आहे आणि तो चहावाला हा के एम हॉस्पिटल पाठीमागचा एक चहावाला आहे. तो त्या कंपनीचा मालक आहे. असा उल्लेख केला. तर तो चहावाला कोण असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील लोकांच्या जीवाशी खेळला आहे. त्याचे मित्र संजय राऊत यांची बेनामी कंपनी आहे. उद्धव ठाकरे यांच्या गुंडानी मागच्या शनिवारी हल्ला केला. त्यामुळे जोपर्यंत आता हा कोविड सेंटर घोटाळा उघड होत नाही,यात सहभागी असणाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हा किरीट सोमय्या गप्प बसणार नाही.

Web Title: Who owns the 100 crore contract for Pune Municipal Corporation Jumbo Covid Center Question of Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.