पोलीस आयुक्तपदी कोण? पुण्यात फेरबदलाची चर्चा, राज्य पोलिसांत बदल्यांचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 04:12 AM2018-03-24T04:12:17+5:302018-03-24T04:12:17+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, मिरा भार्इंदर येथे नवी पोलीस आयुक्तालयाची घोषणा केल्यानंतर आता पिंपरी चिंचवडच्या नव्या पोलीस आयुक्तपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरु झाली असून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील तसेच पद्मनाभन यांची नावे आघाडीवर आहे.
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, मिरा भार्इंदर येथे नवी पोलीस आयुक्तालयाची घोषणा केल्यानंतर आता पिंपरी चिंचवडच्या नव्या पोलीस आयुक्तपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरु झाली असून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील तसेच पद्मनाभन यांची नावे आघाडीवर आहे़ विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत़
पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ पूर्ण होत आला असल्याने त्यांची बदली होणार असून त्या मुंबईला जातील, अशी चर्चा आहे़ या शिवाय सीआयडीचे प्रमुख संजय कुमार, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, नागपूर पोलीस आयुक्त वेंकटेशन, एटीएसचे अतुलकुमार कुलकर्णी, कारागृहाचे भूषणकुमार उपाध्याय या अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा कार्यभार पूर्ण होत असल्याने त्यांची बदली होण्याची शक्यता आहे़
याशिवाय औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे़ या पुढे आपण औरंगाबादला येण्यार नसल्याचे यादव यांनी सांगितले आहे़ त्यामुळे औरंगाबादलाही नवे पोलीस आयुक्त मिळणार आहेत़
- विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर या बदल्या केव्हाही होऊ शकतात़ त्यामुळे येत्या काही दिवसात राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल होऊ शकतात़ याबरोबर पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपायुक्त अशा पदावरील कार्यकाल पूर्ण झालेल्या सुमारे १०० अधिकाºयांची बदली,
तसेच पदोन्नती एप्रिल येत्या महिन्यामध्ये होण्याची
शक्यता आहे़
- पुण्यातील अनेक पोलीस अधिकाºयांना जिल्ह्याबाहेर जावे लागण्याची शक्यता पोलीस दलातून व्यक्त होत आहे.
- ‘कॅट’ने भारतभरातील पोलीस अधिकाºयांच्या सेवा व पदोन्नतीबाबत संपूर्ण अभ्यास करुन नुकताच निर्णय दिला आहे़ राज्यातील १४ अधिकाºयांना पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नती द्यावी लागणार आहे़ ही पदोन्नती देतानाही अनेक अधिकाºयांच्या बदल्या कराव्या लागणार आहे़ त्यामुळे महिनाभरात राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल होणार आहेत़