पुण्याच्या दिशा समितीचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:09 AM2021-07-10T04:09:56+5:302021-07-10T04:09:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्याचे खासदार प्रकाश जावडेकर यांचे मंत्रीिपद गेल्याने आता जिल्ह्यातील सर्व विभागांच्या केंद्रीय योजनांचा आढावा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्याचे खासदार प्रकाश जावडेकर यांचे मंत्रीिपद गेल्याने आता जिल्ह्यातील सर्व विभागांच्या केंद्रीय योजनांचा आढावा घेणाऱ्या जिल्हा सनियंत्रण आणि दक्षता समिती म्हणजे दिशा या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा कुणाला मिळणार, यांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ज्येष्ठ खासदार म्हणून बारामतीच्या सुप्रिया सुळे यांना ही संधी मिळणार का पुण्याचे ज्येष्ठ नेते असलेले खासदार गिरीश बापट विशेष आदेश काढून या समितीचे अध्यक्षपद आपल्याकडे ठेवणार हे लवकरच स्पष्ट होईल.
केंद्रीय ग्रामीण विकास विभागाने केंद्राकडून अनुदान प्राप्त करून देण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेणे त्याची दक्षता आणि संनियंत्रण करण्याचे अधिकार जिल्हास्तरावर दिशा समितीला दिले आहेत. जिल्ह्यातील ज्येष्ठ खासदार हे दिशा समितीचे अध्यक्ष असतात. यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी समिती अध्यक्ष म्हणून काम केले आहे. आढळराव पाटील हे अध्यक्ष असताना दरम्यानच्या काळात प्रकाश जावडेकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला, त्यामुळे केंद्र सरकारने विशेष आदेश काढून जावडेकर यांच्याकडे पुणे जिल्ह्याच्या दिशा समितीचे अध्यक्षपद दिले. खासदार म्हणून जावडेकर हे पुणे ज्युनियर असले तरी केंद्रीय मंत्री असल्याने अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जावडेकर यांच्याप्रमाणे केंद्र शासन हे पद बापट यांना देखील देऊ शकतात.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना मोदी सरकारने काही मंत्र्यांना वगळले. त्यामध्ये प्रकाश जावडेकर यांना देखील डच्चू देण्यात आला. त्यामुळे दिशा समितीचे अध्यक्षपद देखील त्यांच्याकडून जाणार आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा खासदार म्हणून निवडून डिस्टिक मुंबई असल्याने त्यांच्या खासदार निधीचे वितरण आणि कामकाज मुंबई जिल्हा कडून होते. सद्यस्थितीमध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची दुसरी तर गिरीश बापट अमोल कोल्हे यांची पहिली टर्म आहे. वंदना चव्हाण या पहिल्यांदाच राज्यसभेवर गेलेल्या आहेत खासदार सुप्रिया सुळे यांचा राज्यसभा आणि लोकसभेचा एकूण कार्यकाल बघता त्या जिल्ह्यातील ज्येष्ठ खासदार आहेत. यामुळे दिशा समितीचे अध्यक्षपद कुणाला मिळणार हा चर्चेचा विषय ठरला आहे.