...त्या वेळचा मुख्यमंत्री जो असेल तो पांडुरंगाची पुजा करणार; चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:54 PM2022-06-23T12:54:42+5:302022-06-23T12:57:18+5:30

चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील या राजकीय भूंकपावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली

Whoever is the Chief Minister of that time will pooja to Panduranga Indicative statement of Chandrakant Patil | ...त्या वेळचा मुख्यमंत्री जो असेल तो पांडुरंगाची पुजा करणार; चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान

...त्या वेळचा मुख्यमंत्री जो असेल तो पांडुरंगाची पुजा करणार; चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान

Next

पुणे : राज्यात एकनाथ शिंदे आमदारांसहित सुरत आणि मग गुवाहाटीला गेल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. महाविकास आघाडी सरकार पडणार कि राहणार याबाबत तर्क वितर्कही लावले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत भाजप कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसून येत नव्हते. परंतु चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील या राजकीय भूंकपावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आषाढी एकादशीला त्या वेळचा मुख्यमंत्री जो असेल तो पांडुरंगाची पुजा करणार असलयाचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. पुण्यात पालखी सोहळ्यानिमित्त आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

 एकनाथ शिंदे यांनी आम्ही बाळासाहेबांच्या तत्वावर चालणारे आहोत. हिंदुत्व सोडणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भाजप आणि शिवसेनेने एकत्र यावे असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना अधिकच वेग प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आले आहे. आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा केली जाते. परंतु कालच्या या घडामोडीनंतर दरवर्षी होणारी पांडुरंगाची पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावी. अशी वक्तव्य भाजप नेत्यांकडून केली जात आहेत. त्याबाबत यावेळीच पांडुरंगाची शासकीय पूजा कोण करणार? असा प्रश्न पाटलांना विचारला होता. त्या वेळचा मुख्यमंत्री जो असेल तो पांडुरंगाची पुजा हे त्यांनी उत्तर दिले आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या फ़ेसबुक लाइव्ह बाबत माझे काही म्हणणे नाही असही ते म्हणाले आहेत.  

निवडणूक जिंकलो कि आम्ही दिल्लीला जातो 

फडणवीस दिल्लीला का गेले? असे पाटलांना विचारले असता ते म्हणाले. आमच्याकडे एक पद्धत आहे. कोणतीही मोठी निवडणूक जिंकलो की दिल्लीत जाऊन पक्ष श्रेष्ठींना माहिती द्यावी लागते. आणि त्यासाठी फडणवीस हे दिल्लीला गेले आहे. मी खूप दिवस मुंबईत राहिलो असल्याने मी इथ आलो आणि ते दिल्लीला गेले. 

Web Title: Whoever is the Chief Minister of that time will pooja to Panduranga Indicative statement of Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.