‘ऑक्टोबर हीट’विना सरला संपूर्ण महिना; पावसामुळे उकाडा जाणवलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:26 AM2019-10-28T00:26:15+5:302019-10-28T00:26:30+5:30

राज्यातील अनेक शहरांमध्ये ऑक्टोबर महिन्यातील अनेक दिवस पाऊस झाला किंवा आकाश ढगाळ होते़

The whole month without 'October Heat'; The rain did not make sense | ‘ऑक्टोबर हीट’विना सरला संपूर्ण महिना; पावसामुळे उकाडा जाणवलाच नाही

‘ऑक्टोबर हीट’विना सरला संपूर्ण महिना; पावसामुळे उकाडा जाणवलाच नाही

googlenewsNext

विवेक भुसे 

पुणे : पावसाळ्यानंतर हिवाळा सुरूहोण्याच्या आधी उष्णतेची लाट निर्माण होते़ मात्र, मान्सून परतला तरी अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने यंदा आॅक्टोबर हीट जाणवलाच नाही़ दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा कमी आहे़
मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात तसेच कोकण, गोवा व मराठवाड्यात कमाल तापमानात लक्षणीय घट दिसत आहे़ यंदा मान्सूनचे उशिरा आगमन झाले़ तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र एकापाठोपाठ एक निर्माण होत गेले़ या दोन्ही ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र एकावेळी तयार होऊन ते एकमेकांना धडकल्याने राज्यात पावसाचे प्रमाण अधिक राहिले आहे़ राज्यातून मान्सून १५ ऑक्टोबरनंतर माघारी गेला़ ऑक्टोबरच्या २६ दिवसांपैकी अनेक ठिकाणी १५ ते १६ दिवस पावसाचे होते़ त्यामुळे उन्हाचा कडाका जाणवला नाही़

म्हणून घटले तापमान
राज्यातील अनेक शहरांमध्ये ऑक्टोबर महिन्यातील अनेक दिवस पाऊस झाला किंवा आकाश ढगाळ होते़ त्यामुळे कमाल तापमानात घट नोंदविली गेली़ परिणामी दिवसा उकाडा व सायंकाळनंतर गारवा अशी स्थिती यंदा जाणवली नाही़

Web Title: The whole month without 'October Heat'; The rain did not make sense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान