शहरातील होम क्वारंटाइन असलेल्या ९८८ जणांवर वॉच कोणाचा?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 01:44 PM2020-12-23T13:44:59+5:302020-12-23T13:48:30+5:30
शहरात आतापर्यंत कोरोनाचे ९५३३३ रुग्ण सापडले आहेत. यातील ९१८५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे २४४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी : पिंपरी-चिचंवड शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. सध्या शहरातील ९८८ कोरोनाचे रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांवर आरोग्य प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होत असली, तरी खबरदारी घेणे गरजेेचे आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार अशी शक्यता अनेक तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
शहरात आतापर्यंत कोरोनाचे ९५३३३ रुग्ण सापडले आहेत. यातील ९१८५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे २४४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाचा रुग्ण सापडला की, कोविड सेंटर किंवा रुग्णालयात दाखल केले जात होते. पूर्वीच्या तुलनेत आता कोरोनाची भीती कमी झाली आहे. ज्या रुग्णांना गंभीर स्वरूपाची लक्षणे नाहीत. कोणताही त्रास नाही, अशा रुग्णांना आता होम क्वारंटाइन केल्या जाते. कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला की, अशा रुग्णांना औषधे दिली जातात, होम क्वारंटाइन केले जाते. त्यांनी इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य प्रशासनानेदेखील अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
होम क्वारंटाइन रुग्णांचे काय ?
होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांना १४ दिवस घरी क्वारंटाइन राहणे बंधनकारक आहे. ज्या रुग्णांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत, कोणताही त्रास नाही, अशा रुग्णांना होम क्वारंटाइन केले जाते. अशा रुग्णांवर महापालिकेचे प्रशासन लक्ष देत असते. फोनद्वारे रुग्णांशी संपर्क केला जातो. ज्या रुग्णांच्या घरी क्वारंटाइन होण्याची व्यवस्था आहे, अशांनाच होम क्वारंटाइन केले जाते. सध्या बहुतांश रुग्ण होम क्वारंटाइन होण्यास प्राधान्य देत आहेत.
शहरातील एकूण रुग्ण : ९५३३३
सध्या उपचार घेणारे : ७५४
होम क्वारंटाइन रुग्ण : ९८८