तू माझ्या मुलीला का बोलते? वृद्धेला मारहाण, कपडे फाडले; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 10:30 AM2024-01-18T10:30:57+5:302024-01-18T10:31:18+5:30

याबाबत ६५ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कल्याण बढेकर (४८, रा. ताडीवाला रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे....

Why are you talking to my daughter? Old woman beaten, clothes torn; Incident in Pune | तू माझ्या मुलीला का बोलते? वृद्धेला मारहाण, कपडे फाडले; पुण्यातील घटना

तू माझ्या मुलीला का बोलते? वृद्धेला मारहाण, कपडे फाडले; पुण्यातील घटना

पुणे : तू माझ्या मुलीला का बोलते असे म्हणत एका ६५ वर्षीय महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तिच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला. हा प्रकार मंगळवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास ताडीवाला रोड परिसरातील एका सोसायटीत घडला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ६५ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कल्याण बढेकर (४८, रा. ताडीवाला रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिला आरोपी राहत असलेल्या सोसायटीत साफसफाईचे काम करतात. सोमवारी रात्री आरोपीची पत्नी घरातील पाण्याचा कॉक चालू करून गेली होती. त्यामुळे सोसायटीत राहणाऱ्या इतर नागरिकांनी फिर्यादींकडे पाण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपीच्या घरातील नळाचा कॉक रात्रभर सुरू असल्याचे सांगितले.

दरम्यान, आरोपीची मुलगी त्या ठिकाणी आली. तिने फिर्यादी यांना आमचे नाव का सांगितले असे म्हणत वाद घातला. काही वेळाने फिर्यादी या सोसायटीच्या पाण्याच्या टाकीजवळ साफसफाईचे काम करत होत्या. त्यावेळी आरोपी कल्याण बढेकर त्या ठिकाणी आला. तो माझ्या मुलीला का बोलते, असे म्हणत फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच महिलेच्या अंगावरील कपडे फाडून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Why are you talking to my daughter? Old woman beaten, clothes torn; Incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.