आशियाई विषय मांडण्याची लाज का? जानू बरुआ यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 01:57 AM2018-12-25T01:57:46+5:302018-12-25T01:57:57+5:30

आशियाई चित्रपटसंस्कृती श्रीमंत आहे, पण आपण त्याला चांगल्या पद्धतीने सादर करत नाही. आपण पाश्चात्त्य संस्कृती उधार घेतो.

Why is the Asian subject shy? Question of Janu Barua | आशियाई विषय मांडण्याची लाज का? जानू बरुआ यांचा सवाल

आशियाई विषय मांडण्याची लाज का? जानू बरुआ यांचा सवाल

Next

पुणे : आशियाई चित्रपटसंस्कृती श्रीमंत आहे, पण आपण त्याला चांगल्या पद्धतीने सादर करत नाही. आपण पाश्चात्त्य संस्कृती उधार घेतो. आशियाई देशात खूप विषय दडले आहेत जे आपण मांडत नाही आपल्याला ते मांडण्याची लाज वाटते किंवा आपल्याला स्वत:ची संस्कृती माहिती नाही. पाश्चिमात्य दिग्दर्शक त्यांच्या कथा चित्रपटांमध्ये अभिमानाने सांगतात मग आपण का नाही? असा सवाल ज्येष्ठ दिग्दर्शक जानू बरुआ यांनी उपस्थित केला.
नवव्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन जानू बरुआ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एनएफएआयच्या सहायक संचालक कीर्ती तिवारी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे मिलिंद लेले, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे तसेच महोत्सव संचालक सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव उपस्थित होते. यावेळी गजेंद्र अहिरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पुणे माझे दुसरे घर आहे. पुण्यात यायचं निमंत्रण मिळते तेव्हा ते मी चुकवत नाही, अशी भावना व्यक्त करून जानू बरुआ म्हणाले, प्रत्येक चित्रपटसृष्टीला ओळख आणि चेहरा आहे. परंतु, आशियाई चित्रपट ती ओळख प्राप्त करण्यासाठी संघर्ष करतो आहे. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक घटकाने चित्रपटाला मान द्यायला शिकले पाहिजे. पाश्चात्त्य चित्रपटसृष्टीशी तुलना केली असता त्यांच्याकडे सांगण्यासारखी ‘गोष्ट’ नाही. त्या तुलनेत भारतातील विविधतेने नटलेली संस्कृती आणि भाषा यामुळे आपल्याकडे भरपूर ‘गोष्ट’ आहेत. पाश्चात्त्यांकडून उधारीवर घेतलेल्या संकल्पनांवर चित्रपट तयार करण्यापेक्षा आपल्याकडील अस्सल आणि वास्तवदर्शक गोष्टींवर चित्रपट निर्मात्यांनी काम केले पाहिजे. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.

हा आनंदाचा नव्हे, तर दडपण आणणारा क्षण आहे. सिनेमा कसा करायचा माहिती नव्हते, पण करायचा आहे हे पक्के होते. तंत्रज्ञान आणि विषय यात जो बदल झाला त्याचा साक्षीदार ठरलो. काही चढउतार पाहिले पण रसिक मित्रमंडळी पाठीशी राहिली. चित्रपट किती यशस्वी झाला आणि नफा किती मिळवला याचा विचार कधी केला नाही. चित्रपट कसा करायचा नाही हे शिकलो. आज आॅक्सरपर्यंत चित्रपट गेला आहे. पन्नासावा चित्रपट करीत आहे तो प्रवास गमतीशीर आहे. चित्रपट कसा बनवावा, याचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
- गजेंद्र अहिरे

Web Title: Why is the Asian subject shy? Question of Janu Barua

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे