बड्यांचे कर्ज माफ, शेतक-यांचे का नाही : अण्णा हजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:12 AM2018-03-14T01:12:32+5:302018-03-14T01:12:32+5:30
देशात आजपर्यंत उद्योगधार्जिणे सरकारच आले असल्यामुळे आजपर्यंत २२ वर्षांत २२ लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. उद्योजकांचे करोडोंचे कर्ज माफ केले जातात, तर शेतक-यांचे कर्ज का माफ केले जात नाही, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे.
फुरसुंगी : देशात आजपर्यंत उद्योगधार्जिणे सरकारच आले असल्यामुळे आजपर्यंत २२ वर्षांत २२ लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. उद्योजकांचे करोडोंचे कर्ज माफ केले जातात, तर शेतक-यांचे कर्ज का माफ केले जात नाही, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. उरुळी देवाची येथील सोनाई मंगल कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार निर्मुलन जनसंघटनेमार्फत अण्णांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. देशातील शेतकºयांच्या मालाला योग्य हमीभाव, लोकपाल कायद्याची अंमलबजावणी, निवडणूक प्रक्रियेत बदल या विविध मागण्यांसाठी २३ मार्चपासून दिल्ली येथे अण्णांमार्फत सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे, त्या आंदोलनांची दिशा स्पष्ट करताना शेतकरी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अण्णा हजारे बोलत होते.
याप्रसंगी एक मिस्डकॉल देऊन आंदोलनांला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली. तसेच आंदोलनाला तन-मन-धनाने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी राधेश्याम जगताप, दिलीप भाडळे, दिलीप ढोणे, रघुनाथ पाटील, रवींद्र बर्डे, ज्ञानेश्वर राजमाने उपस्थित होते.