‘गुलाबाला काटे का?’ बोधकथेचे सतरा भाषांमध्ये भाषांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:11 AM2021-07-29T04:11:09+5:302021-07-29T04:11:09+5:30
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जर्मनीचे डेप्युटी कॉन्सुल ...
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जर्मनीचे डेप्युटी कॉन्सुल जनरल मारिया आईनिश यांच्या हस्ते बोधकथेचे ऑनलाइन प्रकाशन करण्यात आले. यावेळी एससीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर, बालरंजन केंद्राच्या संस्थापिका नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, शाला समितीचे अध्यक्ष अशोक पलांडे, प्रबंधक डॉ. सविता केळकर, लेखक विष्णू जोशी, मकरंद केळकर, डॉ. सुरेखा जोशी आदी उपस्थिती होते.
विष्णू जोशी म्हणाले,जग अधिकाधिक जवळ येत असून आपल्याला जेवढ्या भाषा येतील तेवढ्या संस्कृतींचा परिचय होईल. गोष्टीरुप माध्यमातून दिलेले संदेश मुलांना अधिक भावतात. गोष्टींची पुस्तके मुलांचे बालपण आनंदी करतात आणि त्यांच्यावर संस्कार होतात.
डॉ. शरद कुंटे म्हणाले, '' नव्वदाव्या वर्षी पुस्तकाचे लिखाण करण्याचे अतुलनीय काम जोशी यांनी केले आहे. फर्ग्युसनचे माजी विद्यार्थी असणा-या जोशी यांनी मुलांसाठी अधिकाधिक लिखाण करावे. त्यांचा या वयातील उत्साह अतिशय दांडगा आणि युवकांना प्रोत्साहन देणारा आहे.