ब्लॅक पबच्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल

By निलेश राऊत | Published: May 24, 2024 03:30 PM2024-05-24T15:30:49+5:302024-05-24T15:31:04+5:30

सुरक्षितता आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आल्याने पुणेकरांमध्ये पोलीस कारभाराबाबत तीव्र नाराजी

Why black pub owner's name omitted from FIR MP Medha Kulkarni's question | ब्लॅक पबच्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल

ब्लॅक पबच्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल

पुणे: वेदांत अगरवाल खटल्यामध्ये ब्लॅक पबच्या मालकाचे नाव एफआयआरमधून का वगळण्यात आले? असा प्रश्न खासदार मेधा कुलकर्णी यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची शुक्रवारी भेट घेऊन उपस्थित केला. तसेच या खटल्यामधील सर्व गुन्हेगारांना, दोषींना त्वरित शासन व्हावे, अशी मागणीही केली.

याबाबत खासदार कुलकर्णी म्हणाल्या, शहरातील अनेक अवैध गोष्टींकडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सुरक्षितता आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आल्याने पुणेकरांमध्ये पोलिस कारभाराबाबत तीव्र नाराजी आहे. अनेक अवैध आणि नियमबाह्य गोष्टींना शहरात उधाण आले आहे. त्यात प्रामुख्याने अनधिकृत पब, बार, रूफ टॉप हॉटेल्सची अवैध बांधकामे, रात्री उशिरापर्यंत चालणारी हॉटेल्स, स्नॅक सेंटर्स, खाद्यपदार्थांचे अनधिकृत स्टॉल्स याचा समावेश आहे. 
      
वेदांत अगरवाल संबंधित घटना हे सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा घटना पुण्यात वारंवार घडत आहेत. अवैध, अनधिकृत गोष्टींवर कारवाई करण्यात पोलिस कुचकामी ठरले आहेत. त्यामुळे पुण्यात एकूण अधिकृत पब, बार किती? अनधिकृत आणि अनियमित किती? याची माहिती मिळावी आणि कारवाईचे वेळापत्रक द्यावे, अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनाव्दारे केली.

दरम्यान प्रभात रोड, नळ स्टॉप चौक येथील नाईट लाईफ आणि रस्त्यावर पहाटे सहा वाजेपर्यंत चालणारी खाद्य पदार्थांची विक्री यावर नागरिकांनी यापूर्वीच आवाज उठवला आहे. रहिवासी क्षेत्रात बार आणि पब असू नयेत, असे निर्देश उपमुख्य मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले आहेतच, असे असूनही रामबाग कॉलनी, बाणेर-बालेवाडी, अशा सर्व ठिकाणी रूफ टॉप हॉटेल्स, बार आहेत, जी गेली अनेक वर्षे चालू आहेत. त्याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यावर कारवाईचा तात्पुरता देखावा केला जातो, असेही निवेदनात म्हटले आहे. अनेक पब आणि बारमध्ये पोलीस अधिकारी अथवा त्यांचे नातेवाईक यांची भागीदारी असल्याने कारवाई होत नाही असे दिसत असल्याचे ही कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे.

Web Title: Why black pub owner's name omitted from FIR MP Medha Kulkarni's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.