अनाथांच्या आरक्षणात ‘क’ वर्गाचा समावेश कशाला? - राज्य सरकारचा नवा अध्यादेश, खरे अनाथ राहतील लाभापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:14 AM2021-08-25T04:14:49+5:302021-08-25T04:14:49+5:30
शून्य ते १८ वयोगटातील अनाथ मुलांना बालगृहामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य सुविधा, शिक्षण, प्रशिक्षण इत्यादी सुविधा पुरविल्या जातात. अनाथ ...
शून्य ते १८ वयोगटातील अनाथ मुलांना बालगृहामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य सुविधा, शिक्षण, प्रशिक्षण इत्यादी सुविधा पुरविल्या जातात. अनाथ मुलांकडे कोणतेही जातीचे प्रमाणपत्र नसते. त्यामुळे त्यांना सरकारच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे सरकारने त्यांना १ टक्का समांतर आरक्षण दिले. या आरक्षणाचा लाभ देण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने अनाथांच्या अ, ब आणि क अशा तीन वर्गवाऱ्या केल्या. त्यामधील अनाथांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
————————————
अनाथांची केलेली वर्गवारी
- अ प्रवर्गात पूर्णत: अनाथ असलेल्या बालकांचा समावेश. ज्यांना कोणतेही नातेवाईक नाहीत. त्यांचा सांभाळ अनाथालयात झाला.
- ब प्रवर्गात आई-वडिलांचे निधन झाले, पण त्यांच्या नातेवाईकांबाबत माहिती उपलब्ध असून, त्यांच्या कागदपत्रावर जातीचा उल्लेख आहे. त्या बालकांचा सांभाळ अनाथालयात झाला आहे.
- क वर्गात ज्या मुलाचे आई-वडिलांचे निधन झाले आहे. परंतु त्या मुलाचे इतर नातेवाईक जीवंत असून, त्यांनी त्या बालकाचे संगोपन केले आहे. त्याच्या जातीबाबत माहिती आहे.
———————————-
अनाथांना आरक्षण मिळण्यासाठी आम्ही झगडलो आणि ते मिळवले. पण आता सरकारने वर्गवारी करून क वर्गाला देखील आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आमचा विरोध आहे. कारण या वर्गातील मुलांना नातेवाईकांनी सांभाळले आहे. त्यांचा आधार त्यांना आहे. त्यामुळे ते पुढील शिक्षण त्यांच्या आधारे घेऊ शकतात. मग त्यांचा आरक्षणाचा लाभ कशाला द्यायचा ? ज्यांना कोणीच नाही, त्यांना खरी गरज आहे. क वर्गाला यातून वगळावे, अशी आमची मागणी आहे.
- गायत्री पाठक-पटवर्धन, संस्थापक, सनाथ वेल्फेअर फांउडेशन
—————————————-