महिलेने बळबजरी केली तर मुलाने आई-वडिलांना का सांगितले नाही? महिलेस जामीन मंजूर
By नम्रता फडणीस | Published: October 9, 2023 05:37 PM2023-10-09T17:37:28+5:302023-10-09T17:37:39+5:30
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने महिलेला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला
पुणे : पीडित मुलाचे वय पाहता असे दिसून येते की, आरोपी महिलेसोबत असलेल्या शारीरिक संबंधाबाबत पीडित मुलाने मौन बाळगले आहे. महिलेने पीडित मुलावर लैंगिक अत्याचार केले असल्यास ही घटना मुलाच्या इच्छेविरुद्ध किंवा जबरदस्तीने घडली होती तर ही गोष्ट पीडित मुलाने आई वडिलांना का सांगितली नाही? असे निरीक्षण नोंदवित अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस .पी. पोंक्षे यांनी आरोपी महिलेस तीन मुली आहेत. आरोपी महिला विधवा आहे,तीन लहान मुली आरोपी महिलेवर अवलंबून आहेत,आरोपी महिलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, याचा विचार करुन लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी महिलेस 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
दि.1 मे 2021 रोजी पासून नोव्हेंबर 2022 दरम्यान ही घटना घडली. मुलाच्या शेजारी राहणारी महिला हिने पीडित अल्पवयीन आहे हे माहिती असताना पीडित मुलाने या महिलेशी जबरदस्ती केली. अशी तक्रार पोलिसात देईन अशी धमकी देऊन पीडित मुलाच्या इच्छेविरोधात, जबरदस्तीने त्याच्या सोबत शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले. पीडित मुलगा त्यांचे सोबत शारीरिक संबंध करीत असतानाचा व्हिडीओ पीडित मुलास शूट करण्यास सांगून जबरदस्तीने दोन ते तीन वेळा कोंढवा बु.पुणे येथे आरोपी महिलेच्या राहत्या घरी पीडित मुलाच्या इच्छेविरोधात,जबरदस्तीने त्यांचे सोबत शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले. म्हणून पीडित मुलाने आरोपी महिलेविरोधात कायदेशीर तक्रार केली आहे. न्यायालयात आरोपी महिलेतर्फे अँड विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. मुलाने दहा महिने उशीरा तक्रार केली आहे. आरोपी महिलेने जर पीडित मुलाच्या इच्छेविरुद्ध,जबरदस्तीने त्याच्याशी शारीरिक संबंध केले असे जर पीडित मुलाचे म्हणणे असेल तर घडल्या प्रकारचे पीडित मुलगाच शूटिंग करत होता ही गोष्ट पीडित मुलाने खोटी तक्रार केल्याचं दर्शवते. तसेच पीडित मुलाच्या चुलत्याने पीडित मुलाचा फोन चेक केल्यावर या प्रकाराला वाच्यता फुटलेली आहे तोपर्यंत पीडित मुलाने सदर प्रकाराबाबत मौन का बाळगले होते तसेच त्याने या प्रकाराबाबत आई वडिलांसोबत का चर्चा केली नाही? असा युक्तिवाद अँड ठोंबरे यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने महिलेला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला.