'तुझ्या वडीलांनी उमेदवारी अर्ज का मागे घेतला नाही', मुलास लोखंडी झाऱ्याने गंभीर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 06:13 PM2021-12-24T18:13:02+5:302021-12-24T18:13:09+5:30
तुझ्या वडिलांचा सोसायटीच्या निवडणुकीत भरलेला उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही. या कारणावरुन एकास लोखंडी झाऱ्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना खेड येथे घडली आहे
राजगुरूनगर : तुझ्या वडिलांचा सोसायटीच्या निवडणुकीत भरलेला उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही. या कारणावरुन एकास लोखंडी झाऱ्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना चांदुस (ता खेड ) येथे घडली आहे. संदीप निवृत्ती कारले ( रा. चांदूस, ता. खेड ) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नांव आहे या घटनेबाबत तीन जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
काळूराम तात्याभाऊ बढे, किरण देवराम बढे काळूराम बढे यांचे घरातील दोन मुले पुर्ण नाव माहीत नाही सर्व ( रा. चांदूस ता. खेड ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चांदुस येथील रानवारा ढाब्यावर फिर्यादी जेवण करण्यासाठी गेले होते. दरम्यान तिथे अगोदरच आरोपी होते. तुझ्या वडीलांचा सोसायटीचा फाँर्म मागे का घेतला नाही या कारणावरून फिर्यादी व आरोपी यांची निवडणुकीच्या वादातुन वादावादी झाली. चौघांनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहान करून काळूराम बढे याने हाँटेमधील लोखंडी झारा फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहे.