पेरून नूकसान का करून घ्यायचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:13 AM2021-08-13T04:13:48+5:302021-08-13T04:13:48+5:30
------------ ज्वारीचे घटले क्षेत्र : खरिपाची ज्वारी फक्त ३०० हेक्टरवर लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील खरिपाची ज्वारी यंदा ...
------------
ज्वारीचे घटले क्षेत्र : खरिपाची ज्वारी फक्त ३०० हेक्टरवर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील खरिपाची ज्वारी यंदा फक्त ३०० हेक्टरवर पेरली गेली आहे. मागील काही वर्षात ज्वारीचे क्षेत्र घटत चालले असून पेरून नुकसान कशाला करून घ्यायचे असा शेतक-यांचा प्रश्न आहे.
ज्वारीला कमी पाऊस लागतो. पीक लवकर हाती येते. त्यामुळे ज्वारीचे पीक पूर्वी बरेच शेतकरी घ्यायचे. जिल्ह्यात ८०० ते ९०० हेक्टरवर ज्वारीची पेर व्हायची.
आता मात्र फक्त ३०० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. तीपण हाती येईल की नाही अशी शंका शेतक-यांच्या मनात आहे. पूर्वी किमान घरी खायला म्हणून तरी बरेच शेतकरी शेतजमिनीच्या काही हिश्शावर तरी ज्वारी करत असत. आता मात्र ज्वारीची पेरणीच जवळपास बंद झाली आहे. खुद्द शेतकरीच आता घरच्या वापरासाठी विकत आणून ज्वारी खातात अशी स्थिती आहे.
घटलेले क्षेत्र सोयाबीन, मका या पिकांनी घेतले आहे. मक्याच्या कणसांवर प्रक्रिया करणार्या ब-याच कंपन्या निर्माण झाल्यामुळे हमखास पैसे मिळवून देणारे उत्पादन म्हणूनही मक्याची शेती करायला प्राधान्य दिले जाते. सोयाबीनचेही तसेच आहे. जिल्ह्यात या दोन्ही पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
--////
जिल्ह्यातील ज्वारीचे सरासरीचे एकूण क्षेत्र- ८०० हेक्टर.
ज्वारी: मागील वर्षीची पेरणी - १२७ हेक्टर. यावर्षी पेरणी- ३०० हेक्टर (वाढ आहे, पण ती जूजबी)
मका: मागील वर्षी- १५५१२ हेक्टर
यावर्षी १७८७२ हेक्टर
सोयाबीन: मागील वर्षी- १७४८२
यावर्षी-३१८७५