तू दुर्लक्ष का करतेस, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर! पीएमपीतील सहकारी असलेल्या राेमियाेला अटक

By नितीश गोवंडे | Published: August 7, 2023 06:29 PM2023-08-07T18:29:31+5:302023-08-07T18:29:47+5:30

आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली...

Why do you ignore, accept my love! Ramiya, a colleague of PMP, arrested | तू दुर्लक्ष का करतेस, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर! पीएमपीतील सहकारी असलेल्या राेमियाेला अटक

तू दुर्लक्ष का करतेस, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर! पीएमपीतील सहकारी असलेल्या राेमियाेला अटक

googlenewsNext

पुणे : पीएमपी बसमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा तिच्या सहकाऱ्याने पाठलाग करून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात पीडित महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.

सुनील धोंडीभाऊ भालेकर (४३, रा. कानहुर पठार, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार ५ जून ते ४ ऑगस्ट दरम्यान घडला. आरोपी सुनील भालेकर हा महिलेच्या कामाच्या ठिकाणी ओळख झालेला सहकारी असून, त्याने मागील दोन महिन्यांपासून महिलेचा पाठलाग केला. तसेच हातवारे करून, शिट्टी मारून तिला कामावर असताना, ‘तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस, मला तू खूप आवडतेस, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर,’ असे म्हणत तिचा विनयभंग केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मधाळे करत आहेत.

प्रेयसीला प्रियकराने दिले सिगारेटचे चटके...

हडपसर परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेचे लग्नापूर्वी प्रकाश सुरेश अडसूळ (३८, रा. गंज पेठ) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, लग्नानंतरही तो महिलेशी संपर्क ठेवून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागला. त्यावर चिडून तक्रारदार महिलेने त्याला शिवीगाळ केली असता, आरोपीने तिला झाडूने व चपलेने मारहाण केली आणि तिला सिगारेटचे चटके देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपीवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Why do you ignore, accept my love! Ramiya, a colleague of PMP, arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.