Video: महाराष्ट्र सरकार अजूनही गप का? तुषार गांधींची पुणे पोलिसात भिडेंच्या विरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 02:29 PM2023-08-10T14:29:08+5:302023-08-10T16:26:25+5:30

उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं कि तपास करू, एक महिना होत आला तरी अजून काही दखल घेण्यात आली नाही

Why is the Maharashtra government still silent Tushar Gandhi complaint against Bhide in Pune Police | Video: महाराष्ट्र सरकार अजूनही गप का? तुषार गांधींची पुणे पोलिसात भिडेंच्या विरोधात तक्रार

Video: महाराष्ट्र सरकार अजूनही गप का? तुषार गांधींची पुणे पोलिसात भिडेंच्या विरोधात तक्रार

googlenewsNext

पुणे: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी आता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात एक विधान केले आहे. यावरून आता वाद निर्माण झाला आहे. या विधानाचे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवशेनात पडसाद उमटले. यावरून काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाली होती. आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी महाराष्ट्र सरकार अजूनही गप का? असा सवाल उपस्थित करत पुण्याच्या डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

तुषार गांधी यांनी दावा केला की, भिडेंनी फक्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचाच नाही तर गौतम बुद्ध, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि पेरियार नायकर यांच्याबद्दल सुद्धा अपमानजनक टिप्पण्या केल्या, ज्यामुळे त्यांना आदर असलेल्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तक्रारीत काही ऑनलाइन व्हिडिओंचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यात भिडे हे समाजसुधारकांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी करताना दिसले. 

याप्रकरणी तुषार गांधी आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी गुरुवारी (दि. १०) पुणे शहरातील डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात भिडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ४९९ (बदनामी), १५३ (ए) (विविध गटांमधील शत्रुत्व वाढवणे) आणि ५०५ (सार्वजनिक गैरव्यवहारास कारणीभूत विधान करणे) या कलामांअंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. यावर डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अभ्यास करून कारवाई करणार असल्याची शाश्वती दिली आहे.

करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नाहीत. ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र असल्याचे वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं. इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केल्याचा दावा संभाजी भिडेंनी केला. या विधानानंतर काँग्रेस, पुरोगामी पक्ष संघटना, समाज चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी करत आहेत. 

Web Title: Why is the Maharashtra government still silent Tushar Gandhi complaint against Bhide in Pune Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.