"मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे शिवसेनाप्रमुख का", नारायण राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 01:29 PM2021-12-06T13:29:15+5:302021-12-06T13:29:32+5:30

मिलिंद नार्वेकर यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. त्या फोटोत बाबरी मशीद पाडण्यासाठी जमाव मशिदीवर चढताना दिसून येत आहे

Why Milind Narvekar is the current Shiv Sena chief said Narayan Rane | "मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे शिवसेनाप्रमुख का", नारायण राणेंचा टोला

"मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे शिवसेनाप्रमुख का", नारायण राणेंचा टोला

Next

पुणे :  पुण्याच्या सिम्बॉयसिस महाविद्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम सेंटरला पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटरला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज भेट दिली. यावेळी फडणवीस यांनी ''नार्वेकरांनी केलेले ट्वीट योग्यच आहे. यावर शेजारी उभ्या असलेल्या नारायण राणेंनी बाईट सुरु असतानाच फडणीसांना थांबवत नार्वेकर म्हणजे आताचे शिवसेनाप्रमुख का? असा टोला लगावला आहे. 

मिलिंद नार्वेकर यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. त्या फोटोत बाबरी मशीद पाडण्यासाठी जमाव मशिदीवर चढताना दिसून येत आहे. शिवाय त्या फोटोवर एक ओळ लिहिलेली आहे. त्यात असे म्हटले आहे की, अयोध्या के राम मंदिर के निर्माण हेतु शिवसैनिकों के बलिदान को कोटी कोटी नमन…या ट्वीटवरून  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी टोला लगावला आहे. मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला आहे. 

फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो 

 देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की, तुम्ही दिल्लीत जा आणि सुखी राहा. भारतीय जनता पक्षात आदेश पाळतात त्याप्रमाणे आम्ही फडणवीस यांचा आदेश पाळला. दिल्लीला गेलो आणि आता केंद्रीय मंत्री पदावर आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीर पासून सुरुवात केली. त्यानंतर आसाम आणि अनेक राज्ये फिरलो. माझ्या आठ नऊ महिन्यांच्या काळात आठ ते नऊ राज्य फिरत पुण्याला आलो आहे. दर महिन्याला पुण्याला येणारा माणूस आज चार महिन्यानंतर पुण्याला आला. आणि त्याला कारण व्यासपीठावर बसलेले देवेंद्र फडणवीस हे आहेत. पण आता आनंद आहे, आम्ही आता मित्र आहोत. त्यांनी आम्हाला दिल्लीला पाठवलं त्याचा वेगळा आनंद आहे. महाराष्ट्रात असताना मुख्यमंत्री झालो विरोधी पक्षनेते पद सांभाळलं

Web Title: Why Milind Narvekar is the current Shiv Sena chief said Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.