सहा वर्षे निविदा का नाही?
By admin | Published: May 12, 2017 05:16 AM2017-05-12T05:16:54+5:302017-05-12T05:16:54+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा गोळा करण्याच्या कामासाठी गेल्या सहा वर्षांपासून निविदा का काढली नाही? याचा जाब स्थायी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा गोळा करण्याच्या कामासाठी गेल्या सहा वर्षांपासून निविदा का काढली नाही? याचा जाब स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाला विचारला. कामाची मुदत संपली असून, निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले. त्यानंतर बीव्हीजी कंपनीला चार महिन्याऐवजी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यास स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी मंजुरी दिली. यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही, असे आदेश स्थायीने प्रशासनास दिले.
शहरातील कचरा गोळा करण्याचे काम बीव्हीजीला दिले आहे. या कंपनीला कामासाठी आणखी चार महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सभेपुढे प्रशासनाने ठेवला होता. त्यावर झालेल्या चर्चेत या कामासाठी गेल्या सहा वर्षांपासून निविदा प्रक्रिया राबविली गेली नसल्याचे योग्य आहे का? निविदा का काढली नाही, असा प्रश्न सावळे यांनी आरोग्य विभागाला विचारला. त्यावर प्रशासनाने हे काम पाच वर्षांसाठी दिले होते, असे सभेत सांगितले. ‘कचरा गोळा करणे हे अत्यावश्यक आहे. या कामासाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया राबविणे संयुक्तीक नाही. कचऱ्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळेच हे काम पाच वर्षांसाठी दिल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यासाठी २०११ मध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात पात्र ठरलेल्या कंपनीला २ जानेवारी २०१२ ला आदेश दिला.
पहिल्या वर्षी ७१४ रुपये प्रति टन आणि त्यापुढील प्रत्येक वर्षासाठी ५ टक्के दरवाढ देण्याच्या अटीसह हे काम दिले होते.