‘टेन्शन कायको लेने का?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:22+5:302021-05-28T04:08:22+5:30

ताण आपण नियोजनबद्धपणे घालवू शकतो. त्यासाठी स्वतःकडे लक्ष देऊन बघण्याची गरज आहे. *ताणतणावाचे नियोजन करण्याच्या तीन पायऱ्या आहेत* ...

"Why the tension?" | ‘टेन्शन कायको लेने का?’

‘टेन्शन कायको लेने का?’

Next

ताण आपण नियोजनबद्धपणे घालवू शकतो. त्यासाठी स्वतःकडे लक्ष देऊन बघण्याची गरज आहे.

*ताणतणावाचे नियोजन करण्याच्या तीन पायऱ्या आहेत*

ताण आलेला ओळखणे

ताण आलाय हे स्वीकारणे.

ताण घालवण्यासाठी नियोजन आणि उपाययोजना करणे

तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. थकवा वाटू लागतो. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम सुरू होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा येतो. संताप वाढतो. आरोग्य बिघडते.

ताण येणे म्हणजे काहीतरी कमीपणाचे आणि दुबळेपणाचे लक्षण असे वाटून आपण अनेकदा ‘मला कधीच टेन्शन येत नाही’ असे म्हणणारे लोक आजूबाजूला बघतो. असे म्हणणारा माणूस खरंतर स्वतःला आलेला ताण स्वीकारण्याचे टाळत असतो.

ताणतणाव होमवर्क वही

ताणाच्या नोंदवहीत मध्ये काय लिहायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अतिशय सोपं आहे.

दिवसभरात त्रासदायक वाटलेल्या 3 घटना रोज लिहाव्या. या घटना काहीही असू शकतात. इतरांच्या आणि तुमच्याही दृष्टीने कदाचित क्षुल्लक वाटलेली बाबही तुम्ही नोंदवू शकता.

तीव्रता नोंदवल्यावर कोणत्या कारणाने ताण आला हे लिहायचे.

ताण कसा घालवला हे त्यात लिहायचे. अशी ताणाची डायरी ठेवल्याने आपले स्वभान वाढते

ताणतणावाचे नियोजन आणि उपाययोजना :-

ताण ही कायम टिकणारी अवस्था नाही. तो आपोआप कमीसुद्धा होतो हे आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे. ताण वाढण्याआधीच त्यावर उपाय करण्यासाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत :-

आधार वाटणारे नातेसंबंध जोपासले पाहिजेत.

आपल्या आवडीचे गाणे ऐकायला हवे.

ताण वाटणार नाही अशा पद्धतीने स्वतःच्या आयुष्याची ध्येये ठरवणे.

पुरेशी झोप घ्यायला हवी. कामाचे तास झोपेच्या वेळेवर अतिक्रमण करता कामा नये.*

छंद जाणीवपूर्वक जोपासायला हवा.

Web Title: "Why the tension?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.