पुणे शहरातील सहा मीटर रस्त्यांचे लवकरच रूंदीकरण होणार : हेमंत रासने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 09:08 PM2020-12-29T21:08:12+5:302020-12-29T21:09:00+5:30

शहरामध्ये अनेक ठिकाणी कमी रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरता येत नसल्यामुळे या ठिकाणच्या बांधकामांचा प्रश्न निर्माण

Widening of six meter roads in Pune city will be done soon: Hemant Rasane | पुणे शहरातील सहा मीटर रस्त्यांचे लवकरच रूंदीकरण होणार : हेमंत रासने 

पुणे शहरातील सहा मीटर रस्त्यांचे लवकरच रूंदीकरण होणार : हेमंत रासने 

googlenewsNext

पुणे : शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी ६ व ९ मीटर रस्त्यांचे कलम २१० अंतर्गत रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी हरकती- सूचना मागविण्यास प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. 

शहरामध्ये अनेक ठिकाणी कमी रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरता येत नसल्यामुळे, या ठिकाणच्या बांधकामांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर शहरातील पेठा आणि मध्यवर्ती भागातील रस्ते कमी रुंदीचे असल्यामुळे इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुध्दा प्रलंबित होता. परंतु, आता शहरातील ६ मीटर रुंदीचे ३२३ रस्ते ९ मिटर रूंद करण्यासाठी हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यास परवानगी दिल्यामुळे सदर रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान स्थायी समितीने ३२३ रस्त्यांसह शहरातील सर्वच छोट्या रस्त्यांच्या रुंदीकरणास यापूर्वीच संमती दिली आहे. 

पुणे शहराच्या नियोजनबध्द विकास होण्यासाठी ६ व ९ मीटर रस्त्यांचे रुंदीकरण २१० अंतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने सुध्दा सुधारित बांधकाम नियमावलीमध्ये याला सहमती दर्शवली आहे. या निर्णयामुळे शहरातील रखडलेला विकास, बांधकाम प्रकल्प यांना चालना मिळेल व पेठांमधील जुन्या वाड्यांचा प्रश्न यामुळे सुटण्यास मदत होईल. त्यातून शहराचा सर्वांगिण विकास होईल असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला आहे.  
    ---------------------------------

Web Title: Widening of six meter roads in Pune city will be done soon: Hemant Rasane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.