कोरोना’ची तपासणी करण्यास सांगणाऱ्या पतीवर विळ्याने हल्ला ; पत्नीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 05:04 PM2020-03-28T17:04:15+5:302020-03-28T17:05:57+5:30
जगभरात पसरलेल्या कोरोनाने आत अर्थव्यवस्थेबरोबरच कुटुंबव्यवस्थेवर परीणाम करण्यास सुरवात केली आहे.बारामती शहरात कोरोनाची तपासणी करण्यास नकार देणा-या पतीवर विळ्याने हल्ला करण्याची घटना बारामती शहरात गुरुवारी(दि २६) घडली आहे.
पुणे (बारामती) ;जगभरात पसरलेल्या कोरोनाने आत अर्थव्यवस्थेबरोबरच कुटुंबव्यवस्थेवर परीणाम करण्यास सुरवात केली आहे.बारामती शहरात कोरोनाची तपासणी करण्यास नकार देणा-या पतीवर विळ्याने हल्ला करण्याची घटना बारामती शहरात गुरुवारी(दि २६) घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पती महेश हिरामण शिंदे यांनी शहर पोलीसात फिर्याद दिली आहे.त्यानुसार पत्नी गौरी महेश शिंदे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरीहून पत्नी गौरी आलेली होती, त्या मुळे वैद्यकीय तपासणी करुन घे, असे महेश शिंदे यांनी गौरी हिला सांगितले. यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यांनी रागाच्या भरात पतीला लोखंडी विळ्याने मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.अधिक तपास पोलीस नाईक राजश्री आटोळे तपास करीत आहेत.