पत्नीला बळजबरीने सर्वांसमोर अंघोळ करायला लावली, अघोरी पुजा; मोबाइल पोलिसांकडे जमा

By नम्रता फडणीस | Published: June 13, 2024 08:27 PM2024-06-13T20:27:51+5:302024-06-13T20:28:33+5:30

पती आंघोळीचे चित्रीकरण ‘व्हायरल’ करेल, पत्नीची भीती; कथित चित्रीकरण केलेला मोबाइल पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश...

Wife forced to bathe in front of everyone, Aghori Puja; Submitted to Mobile Police | पत्नीला बळजबरीने सर्वांसमोर अंघोळ करायला लावली, अघोरी पुजा; मोबाइल पोलिसांकडे जमा

पत्नीला बळजबरीने सर्वांसमोर अंघोळ करायला लावली, अघोरी पुजा; मोबाइल पोलिसांकडे जमा

पुणे : मांत्रिकाच्या बतावणीवरून पत्नीला बळजबरीने आंघोळ करायला लावून, त्याचे पतीने मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. पती हे चित्रीकरण ‘व्हायरल’ करेल, अशी पत्नीने न्यायालयात् भीती व्यक्त केली. त्यावर पतीला एका आठवड्याच्या आत त्याचा मोबाइल तपासासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी दिले. तसेच पतीचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला.

लावणाऱ्या पतीचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला. या आंघोळीचे चित्रीकरण पतीने केले असून, ते ‘व्हायरल’ केले जाईल, अशी भीती पत्नीने न्यायालयात व्यक्त केली, त्यावर पतीला एका आठवड्याच्या आत त्याचा मोबाइल तपासासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी दिले.

या प्रकरणात पीडित महिलेच्या पतीसह सासू-सासरे आणि मांत्रिकाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक, नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, जयसिंगपूर येथील मौलाना बाबा जमादार या मांत्रिकाला अटकही करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात विवाहित महिलेने ऑगस्ट २०२२ मध्ये तक्रार दिली आहे, तर पतीनेही पत्नी व तिच्या वडिलांविरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणात पतीला डिसेंबर २०२२ मध्ये जामीन झाला होता.

पुत्रप्राप्तीसह व्यवसायात भरभराट व्हावी, घरात सुखशांती नांदावी आणि भानामती उतरविण्यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून अघोरी पूजा करण्यास भाग पाडून मार्लेश्वर येथील धबधब्याखाली जबरदस्तीने सर्वांसमोर आंघोळ करायला लावून, त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले आहे. पती हे चित्रीकरण ‘व्हायरल’ करेल, असे कारण देत तक्रारदार पत्नीने पतीच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला. तपास अधिकाऱ्यांनीही पतीचा मोबाइल जप्त केला नसल्याचे सांगितले. पतीच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. सत्यम निंबाळकर यांनी आरोपी आपला मोबाइल तपासासाठी पोलिसांकडे जमा करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यावर उच्च न्यायालयाने पतीला मोबाइल फोन पोलिसांकडे जमा करण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Web Title: Wife forced to bathe in front of everyone, Aghori Puja; Submitted to Mobile Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.