प्रियकराच्या मदतीने पतीला नपुसंक बनविण्याचा पत्नीने आखला कट; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 18:49 IST2020-10-26T17:44:15+5:302020-10-26T18:49:34+5:30
मोबाईल चॅटमुळे आला प्रकार उघडकीस

प्रियकराच्या मदतीने पतीला नपुसंक बनविण्याचा पत्नीने आखला कट; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : प्रियकराच्या मदतीने पतीला नपुसंक बनविण्याचा कट पत्नीनेच बनविण्याचा आखला होता. पण ही गोष्ट मोबाईल चॅट पाहिल्याने पतीला त्याचा वेळीच सुगावा लागला.याबाबत २७ वर्षाच्या पतीने वारजे माळवाडीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार वारजे पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी, पत्नी ही मेकॅनिकल इंजिनिअर आहे. पुण्यातील एका कंपनीत काम करत असताना तिची त्याच कंपनीतील एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु, लग्न करायला दोघांना अडचण होती. दोघेही वेगळे झाले. तिचे एका सॉफ्टवेअर इंजिनिअरशी लग्न झाले. मुळ गावी गेल्यावर ते वारजे येथे खोली घेऊन राहू लागले. एकाच कंपनीत असल्याने पत्नीचे प्रियकराबरोबर पुन्हा संबंध जुळले. त्यांनी पतीला जखमी करुन नपुसंक बनविण्याची योजना आखली. दरम्यान, ते हनीमूनला महाबळेश्वर येथे गेले होते. तेथे प्रियकरही आला. प्रियकरही त्याच परिसरात राहत असल्याने तेथे हे तिघे भेटले. त्यांनी पार्टी केली. त्यानंतर पत्नीने त्याची लॉकडाऊन नोकरी गेली. राहायलाही अडचणी असल्याचे सांगून त्याला आपल्या घरी राहायला बोलावले़. त्यानुसार तो या पती पत्नीच्या घरी राहायला आला. महाबळेश्वर येथील हनिमुनचे फोटो पाहण्यासाठी पतीने पत्नीचा मोबाईल पाहिला. तेव्हा त्याला काही फोटो संशयास्पद दिसले. रात्री सर्व जण झोपल्यावर त्याने त्या प्रियकराचा मोबाईल घेऊन त्यावरील चॅट पाहिले. तेव्हा त्याला धक्काच बसला. त्या या दोघांचे चॅटिंग होते. दोघांनी एक कट रचल्याचे त्याला आढळून आले. घरात चोरीचा बनाव करुन पतीच्या खासगी भागाची नस कापून त्याला नपुसंक बनविण्याची चर्चा त्या चॅटमध्ये केली होती. त्याला नपुसंक बनविल्यानंतर तिघांनीही एकत्र राहायचे असे दोघांच्या चॅटमध्ये होते.
या सर्व प्रकाराने पती प्रचंड घाबरला़ व त्याने कामानिमित्त बाहेरगावी जात असल्याचे सांगून मूळ गावी गेला. तेथे सर्व विचार केल्यानंतर तो पुन्हा पुण्यात आला व त्याने थेट वारजे माळवाडी पोलसांकडे जाऊन फिर्याद दिली आहे.