Pune | कौटुंबिक वादातून पत्नीचा डोक्यात टिकाव मारून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 01:59 PM2023-01-06T13:59:36+5:302023-01-06T13:59:49+5:30

पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा...

Wife was killed by a blow to the head due to a family dispute pune latest crime news | Pune | कौटुंबिक वादातून पत्नीचा डोक्यात टिकाव मारून खून

Pune | कौटुंबिक वादातून पत्नीचा डोक्यात टिकाव मारून खून

googlenewsNext

पुणे : वीट कामगाराने कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात टिकाव मारून खून केला. याप्रकरणी पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला.

विनोदकुमार केहरसिंग बंजारा (वय ३५, सध्या रा. कासार अंबोली, मुळशी, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्याने १९ फेब्रुवारी २०१७ रोजी कासारअंबोली येथे दुपारी पाचच्या सुमारास पत्नी सुनीतादेवा बंजारा (वय २८) यांचा खून केला. विनोदकुमार याच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याबाबत वीटभट्टीचालक रमेश बंडू कांबळे (वय ६०, रा. कासारअंबोली) यांनी फिर्याद दिली होती. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एन. एस. मोरे आणि पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी या गुन्ह्याचा तपास केला तर सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले.

सहायक उपनिरीक्षक बी. बी. कदम, विद्याधर निचित, सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. विनोदकुमार आणि त्याची पत्नी सुनीतादेवा हे एका वीटभट्टीवर कामगार होते. घटनेच्या दिवशी दुपारपर्यंत त्यांनी भट्टीवर काम केले. दुपारनंतर त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून भांडण झाले. त्यामुळे विनोदकुमार याने चिडून पत्नीच्या डोक्यात जमीन खांडण्यासाठी वापरण्यात येणारा टिकाव मारला. त्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे विनोदकुमार याने तेथून पळ काढला होता. या प्रकाराची माहिती भट्टी मालकाने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत विनोदकुमारला शोधले व त्याला अटक केली.

Web Title: Wife was killed by a blow to the head due to a family dispute pune latest crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.