पत्नीचा आयक्यू कमी; दिला घटस्फोट, पत्नीने क्रूरतेची वागणूक दिल्याची न्यायालयाची टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 06:15 AM2023-08-09T06:15:26+5:302023-08-09T06:15:51+5:30
घटस्फोटानंतर दोन वर्षांतच या जोडप्याचा संसार संपुष्टात आला. रमेश आणि सीमा (नावे बदललेली) असे या जोडप्याची नावे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीचा बुद्ध्यांक (आयक्यू) कमी असतानाही तिचे लग्न लावून देण्यात आल्याने पतीने न्यायालयात धाव घेतली. पत्नीची बुद्ध्यांक चाचणी केल्यानंतर ती सुज्ञ नसल्याचे लक्षात आल्याने पतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला. क्रूरतेच्या आधारावर दाखल केलेल्या या दाव्यात कोर्टाने पतीला पत्नीपासून घटस्फोट मंजूर केला आहे.
घटस्फोटानंतर दोन वर्षांतच या जोडप्याचा संसार संपुष्टात आला. रमेश आणि सीमा (नावे बदललेली) असे या जोडप्याची नावे आहेत. त्यांचे ६ जुलै २०२१ला लग्न झाले होते. त्यांना मूलबाळ नाही. सीमा यांना कामे जमत नसल्याचे रमेश यांच्या लक्षात आले. एकदा सीमा यांनी गॅस सुरू ठेवला होता. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर गॅस बंद करण्यात आला. रमेश यांनी सीमा यांची बुद्ध्यांक चाचणी करून घेतली. त्यातून सीमा या सुज्ञ नसल्याचे निदर्शनात आले. त्यांच्या उपचारासाठी येण्यास आई-वडिलांची नकार दिला. त्याचा त्रास सहन करावा लागला, असे रमेश यांनी दाव्यात नमूद केले आहे.
एकतर्फी आदेश
पत्नी रमेश यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्यात पत्नी हजर झाली नाही. त्यामुळे न्यायालयाने एकतर्फी आदेश दिला. पत्नीने रमेश यांना क्रूरतेची वागणूक दिली. त्यामुळे ते घटस्फोट मिळण्यास पात्र आहे, असे नमूद करीत न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला.