दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ मिळणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:09 AM2021-04-05T04:09:21+5:302021-04-05T04:09:21+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षण मंडळाकडे क्रीडा गुणांचा लाभ मिळावा म्हणून विद्यार्थ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच मागील वर्षी झालेल्या क्रीडा ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षण मंडळाकडे क्रीडा गुणांचा लाभ मिळावा म्हणून विद्यार्थ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच मागील वर्षी झालेल्या क्रीडा स्पर्धांच्या कामगिरीचा विचार करून विद्यार्थ्यांना क्रीडा गुण द्यावेत, असा पत्रव्यवहार राज्याच्या क्रीडा विभागाकडे व शिक्षण मंडळाकडे काही क्रीडा शिक्षकांनी केला आहे. कोरोना नसता तर आम्ही विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिक पटकाविले असती. स्पर्धा झाल्या नाहीत; त्यात आमचा काहीही दोष नाही. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा खेळाडूंकडून व्यक्त केले जात आहे.
-------------
इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत. तसेच त्यांनी चमकदार कामगिरी दाखविली आहे. कोरोनामुळे स्पर्धा होऊ शकले नाहीत यात विद्यार्थ्यांना दोषी धरता येणार नाही. त्यामुळे कोरोना पूर्वी झालेल्या स्पर्धांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी विचारात घेऊन त्यांना क्रीडा गुणांचा लाभ द्यावा ,अशी मागणी शिक्षण मंडळाकडे केली आहे.
- फिरोज शेख, क्रीडा शिक्षक, एसएनबीपी स्कूल
------------
हॉकी या खेळात मी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकाविली आहेत. कोरोनामुळे वर्षभर स्पर्धाच होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला क्रीडा गुण मिळणार की नाही? याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. शासनाने याबाबत स्पष्टता आणावी.
- धैर्य शर्मा, विद्यार्थी,
------------
हॉकी , कबड्डीच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मी राष्ट्रीय स्तरावरपर्यंत गेले आहे. कोरोना नसता तर आम्ही सर्व विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालो असतो आणि आम्हाला क्रीडा गुणांचा लाभ राज्य मंडळाकडून मिळाला असता. त्यामुळे यात विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नाही शासनाने क्रीडा गुण देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
- सिद्धी पिसे, विद्यार्थी
-------------------
मागील वर्षी क्रीडा गुणांचा लाभ मिळालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
विभाग विद्यार्थी
पुणे ४,९६३
नागपूर १,८६३
औरंगाबाद २,६२३
मुंबई ४,२३५
कोल्हापूर ३,३७७
अमरावती २,९३४
नाशिक ३,१३०
लातूर ३,११४
कोकण १,१६१
एकूण २७,४००