राड्यामुळे स्वीकृत सदस्य नावे बदलणार?

By admin | Published: May 15, 2017 06:39 AM2017-05-15T06:39:43+5:302017-05-15T06:39:43+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका स्वीकृत सदस्यपदावरून नाराज कार्यकर्त्यांनी शनिवारी राडा केला. खासदार अमर साबळे आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष

Will the accepted member names change due to change? | राड्यामुळे स्वीकृत सदस्य नावे बदलणार?

राड्यामुळे स्वीकृत सदस्य नावे बदलणार?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्वीकृत सदस्यपदावरून नाराज कार्यकर्त्यांनी शनिवारी राडा केला. खासदार अमर साबळे आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्या प्रतिमेचे दहन केले. आयुक्तांकडे नावे दिल्यानंतरही सर्वसाधारण सभेत नावे बदलता येऊ शकतात. त्यामुळे आशेचा एक किरण निर्माण झाल्याने वादग्रस्त नावे बदलू शकतात, अशी चर्चा भाजपाच्या वर्तुळात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची एकमुखी सत्ता आली आहे. उमेदवारी देण्यापासून तर विविध पदे देण्यात स्थानिक नेत्यांमध्ये वर्चस्ववादाचे राजकारण दिसून आले. खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्यात धुसफूस सुरू असल्याचे दिसते. निवडणुकीनंतर आमदार लांडगे गटाचे नितीन काळजे यांना महापौरपद, तर जगतापसमर्थक सीमा सावळे यांना स्थायी समिती अध्यक्षपद आणि निष्ठावान कार्यकर्ते एकनाथ पवार यांना सत्तारूढ पक्षनेतेपद दिले होते. नव्या-जुन्यांची मोट बांधण्याचे काम नेत्यांनी केले होते. काही प्रमाणात स्थानिक नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण दिसून आले. त्यानंतर स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. स्वीकृतपदी नेत्यांच्या बगलबच्च्यांना संधी देऊ नये, यासाठी जुन्या कार्यकर्त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती.
भाजपाकडून स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार, निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी देणार की पक्ष संघटनेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणार, अशी चर्चा रंगली होती. मुख्यमंत्र्यांनी संघटन सरचिटणीस माऊली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे यांची नावे पक्षनेत्यांनी नावे दिली आणि येथूनच गटबाजीला सुरुवात झाली.
निष्ठावंतांना डावलल्याने नाराजी
स्वीकृत सदस्यपदासाठी माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश पदाधिकारी महेश कुलकर्णी, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, माजी नगरसेवक शंकर जगताप, अमर मूलचंदानी, सारंग कामतेकर, शांताराम भालेकर, विजय फुगे, सचिन लांडगे, मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस बाबू नायर, सूरज बाबर, निहाल पानसरे यांची नावे चर्चेत होती. तसेच पराभूत उमेदवार किंवा पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले, तर पुण्याप्रमाणेच राड्याची तयारीही केली होती. मात्र, राडा होऊ न देण्याची दक्षता मुख्यमंत्री घेतील अशी अपेक्षा होती. खासदार समर्थक थोरात आणि पटवर्धन समर्थक नायर यांना संधी दिल्याने भाजपात नाराजीचा सूर होता. तो शनिवारी उघड झाला.

Web Title: Will the accepted member names change due to change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.