सोमवारी महाविद्यालये सुरू होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:21 AM2021-02-28T04:21:45+5:302021-02-28T04:21:45+5:30
पुणे: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ...
पुणे: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अद्याप रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झालेला नाही. त्यामुळे शहरातील महाविद्यालये पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येतात. फेब्रुवारी महिन्यात आठवडाभर काही महाविद्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र, कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील शाळा - महाविद्यालये येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या 1 मार्चपासून महाविद्यालये बंद ठेवली जाणार की पुन्हा सुरू होणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.
ऑफलाईन वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाल्याने काही विद्यार्थ्यांनी पुण्यात भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहण्यास सुरूवात केली. परंतु, पुन्हा ऑनलाईन वर्ग सुरू झाल्याने गावी जावे की पुण्यातच थांबावे, असा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण आहे. मात्र, दररोज कोरोना रुग्ण वाढत असल्याने विद्यार्थी महाविद्यालयात येऊन शिक्षण घेण्याची शक्यता आता कमी झाली आहे.