पर्यटनवाढीच्या दृष्टीने भोरचा विकास करणार : संग्राम थोटपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:11 AM2021-02-08T04:11:03+5:302021-02-08T04:11:03+5:30
भोर नगरपलिकेच्या वतीने ५ लाख रु खर्चुन उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँइटचे, १ कोटी ५० लाख रूपये रस्त्याच्या कामाचे उद्घाटन, ...
भोर नगरपलिकेच्या वतीने ५ लाख रु खर्चुन उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँइटचे, १ कोटी ५० लाख रूपये रस्त्याच्या कामाचे उद्घाटन, २० लाख रुपये जाँगींग ट्रँकचे व २५ लाख रुपये छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्वराज्य शपथ पुतळ्याच्या मेघडंबरीचे भुमीपुजन या सारख्या आदी विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष शैलेश सोनवणे नगराध्यक्ष निर्मला आवारे, मुख्यधिकारी डाॅ. विजय कुमार थोरात, कृष्णा शिनगारे, अनिल सावले, अंकुश खंडाळे, अनिल पवार, सचिन हर्णसकर, सुमंत शेटे, अमित सागळे, गणेश पवार, तृप्ती किरवे, आशा रोमण, अमृता बहिरट, स्नेहा पवार, समिर सागळे, आशा शिंदे, वृषाली घोरपडे, सोनम मोहिते, चंद्रकांत मळेकर, सादिक फरास, पदमिनी तारु, देवीदास गायकवाड, अभिजित सोनावले, मंगेश शिंदे रुपाली कांबळे उपस्थित होते.
थोपटे म्हणाले, तालुक्यातील भोर-कापुरव्होळ-भोर-महाड या रस्त्याची कामे सुरु आहेत. भविष्यात अनेक कामे होणारा आहेत. यामुळे भोर तालुक्याचा पर्यटन दृष्टा विकास होणार आहे.
फोटो : स्मशानभुमी लोकार्पण करताना आमदार संग्राम थोपटे, नगराध्यक्ष निर्मला आवारे व इतर