स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गाचा वनवास संपणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:09 AM2020-12-29T04:09:25+5:302020-12-29T04:09:25+5:30

धनकवडी : शहरामध्ये वाढणारी खाजगी वाहने आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी पुणेकरांच्या दिमतीला देशात सर्वप्रथम जलद बस वाहतूक ...

Will the exile of Swargate-Katraj BRT route end? | स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गाचा वनवास संपणार का ?

स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गाचा वनवास संपणार का ?

Next

धनकवडी : शहरामध्ये वाढणारी खाजगी वाहने आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी पुणेकरांच्या दिमतीला देशात सर्वप्रथम जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) १४ वर्षांपूर्वी मोठ्या दिमाखात आणली. मात्र देशात सर्वप्रथम बीआरटी सुरू होण्याचा मान मिळूनही पुणे शहरात सध्या हि सेवा अजूनही सुरू नाही. अर्धवट बांधकामांमुळे वाहतुकीस होणारे अडथळे, वाहनांची वाढती संख्या, प्रदुषण, पालिकेतील सत्तांतर, मेट्रोला मिळालेले प्राधान्य यामुळे बीआरटी कुंठीत झाली. स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गाचा १४ वर्षांचा वनवास संपणार का ? बीआरटीची ‘बिकट वाट वहिवाट’ बनणार का ? असा प्रश्र्न नागरिकांना पडला आहे.

पुणे शहरात बीआरटी उभारण्याचा प्रयत्न २००७ मध्ये झाला. सुरुवातीच्या काळात बीआरटीची अत्याधुनिक व्हाॅल्वो बस ही एक स्वतंत्र ओळख होती. त्यामुळे त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. साध्या बस पेक्षाही आधुनिक बसमध्ये प्रवास करणे म्हणजे बीआरटी प्रकल्प असा समज प्रवासांमध्ये होताेय त्याच दरम्यान एक एक बस बंद पडत गेल्या आणि सुमारे सहा कोटींच्या बस आजमितीला धूळ खात पडून आहेत. स्वारगेट ते हडपसर हा बीआरटी मार्ग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्या अंतरावरील बीआरटी पूर्णतः नामशेष झाला आहे. नगररोड बीआरटी मार्ग कार्यान्वित नाही. सातारा रस्ता बीआरटी हि केवळ सहा किमी अंतरावरच अस्तित्व टिकून आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या आधुनिक दर्जेदार बस कधी उपलब्ध होणार हा प्रश्न प्रवासांसमोर आहे.

दोनशे कोटींचा चुराडा करुन ही स्वारगेट कात्रज बीआरटी प्रकल्प पुणेकरांसाठी अजूनही डोकेदुखीच ठरत आहे. बीआरटी मार्ग सुरू होण्या आधीच त्याची दुरवस्था झाली आहे. वाहतूककोंडी मुक्त आणि सुटसुटीत जलद प्रवास स्वप्नवत असून बीआरटी मार्ग ना सुरू आहे ना पूर्ण बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची द्विधा मनस्थिती झाली आहे. या कोंडमाऱ्यातून सर्वसामान्य नागरिकांची सुटका कधी होणार.?

-सुशांत ढमढेरे, सामाजिक कार्यकर्ते.

बीआरटी मार्ग सातारा रस्त्याला लागलेले ग्रहण आहे. त्यातून सुटका व्हायची असेल तर प्रशासन, लोकप्रतिनिधींनी प्राधान्याने तो प्रकल्प पूर्णत्वास नेऊन नागरिकांच्या सेवेत आणणे ही नैतिक जबाबदारी आहे.

- अँड. दिलीप जगताप - दक्षिण पुणे प्रवासी मंच.

दोन्ही बाजूला स्वयंचलीत दरवाजे असणाऱ्या बस उपलब्ध आहेत. मात्र मार्ग सुरू होण्यापुर्वी एकदा पाहणी केली जाणार आहे. त्रुटी दूर करून सातारा रस्ता बीआरटी मार्ग लवकरच सुरू होईल.

- दत्तात्रय झेंडे, प्रभारी वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएल

पीएमपीएल प्रशासनाने सुचविलेल्या जवळपास सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली असून काही किरकोळ कामे आठ दिवसांत पुर्ण होतील.

- अतूल कडू, कनिष्ठ अभियंता, महापालिका

Web Title: Will the exile of Swargate-Katraj BRT route end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.