शिरूर मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी जोमाने लढू, मनसेचा विजयाचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 02:48 PM2023-10-10T14:48:13+5:302023-10-10T14:50:37+5:30
शिरूर लोकसभा मतदारसंघ पूर्ण ताकतीने लढवणार...
नारायणगाव (पुणे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बांधणी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असून शिरूर लोकसभा मतदारसंघ पूर्ण ताकतीने लढवणार अशी घोषणा मनसे नेते बाबू वागस्कर यांनी नारायणगाव येथे केली.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर व आंबेगाव या तालुक्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा वारुळवाडी नारायणगाव तसेच खेड तालुक्याचा मेळावा सावरदरी येथे पार पडला. यावेळी मनसे जनहित कक्षाचे तालुका उपाध्यक्ष धनंजय दाते, विनोद राजनकर, शेतकरी सेनेचे योगेश तोडकर, तानाजी तांबे डॉक्टर गणपत डुंबरे, सुभाष जगताप, महिला आघाडीच्या प्रांजल पंकज भाटे, प्रणय लेंडे, अनिल देशपांडे, सहकार सेनेचे दिनेश बाणखेले, आंबेगाव तालुका अध्यक्ष संतोष बोऱ्हाडे, नवनाथ वाळुंज, तालुका अध्यक्ष साईनाथ ढमढेरे, दिलीप खिल्लारी, सागर शिंदे, किरण शेळके, दीपक गुंजाळ, नवनाथ वाळुंज, विजय कुचिक, मयूर वाळुंज, सुशांत दिवटे, आंबेगाव तालुका अध्यक्ष संतोष बोऱ्हाडे, मंचर शहराध्यक्ष सागर घुले आदींसह पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.
यावेळी सरचिटणीस व निरीक्षक अजय शिंदे, शिक्षक सेनेचे सरचिटणीस विद्यानंद मानकर, मनसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय जामदार, मनसे राज्य उपाध्यक्ष व निरीक्षक अरविंद गावडे, पिंपरी चिंचवडचे नगरसेवक सचिन चिखले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर यांनी शिरूर लोकसभा पूर्ण ताकतीने लढवणार अशी घोषणा केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बांधणी संपूर्ण महाराष्ट्रात चालू असून याबाबत राज्यात सर्व ठिकाणी सर्व तालुक्यात मेळावे चालू आहेत. मनसेचा शिरूर लोकसभेचा पुढील मेळावा हा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार असून लवकरच याची तारीख जाहीर केली जाईल, अशी घोषणा वागस्कर यांनी केली. यावेळी जुन्नर व आंबेगाव येथील मनसे पदाधिकारी यांची भाषणे झाली. त्यात प्रामुख्याने यावेळी विविध पक्षांच्या ३५ कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. स्वागत खिलारवाडीचे सरपंच व तालुका उपाध्यक्ष दिलीप खिल्लारी यांनी केले, तर मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांनी आभार मानले.