राजकारणविरहित कामांना प्राधान्य देणार : ॲड. अशोक पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:13 AM2021-09-15T04:13:26+5:302021-09-15T04:13:26+5:30
सणसवाडी ग्रामपंचायतीच्या साडे पाच कोटीच्या विकासकामांस प्रारंभ कोरेगाव भीमा :गावकारभारी उत्कृष्ट काम करत असेल तर गावचा विकासही सर्वांगीण होतो. ...
सणसवाडी ग्रामपंचायतीच्या साडे पाच कोटीच्या विकासकामांस प्रारंभ
कोरेगाव भीमा :गावकारभारी उत्कृष्ट काम करत असेल तर गावचा विकासही सर्वांगीण होतो. सणसवाडी ग्रामपंचायतीने गेल्या सात महिन्यांत मोठी झेप घेत विकासकामांचा धडाका लावला आहे. यासाठी राजकारणविरहित विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी सांगितले.
सणसवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण, नरेश्वर मंदिर सुशोभीकरण, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका वाचनालय या बहुउद्देशीय इमारत, स्मशानभूमी परिसर सुधारणा अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण, एल ई डी स्ट्रीट लाईट, अंतर्गत ड्रेनेज लाईन, अंगणवाडी इमारत बांधकाम, प्राथमिक शाळा वर्ग खोल्या बांधणे, पाणीपुरवठा सुविधा, प्राथमिक आरोग्य व लसीकरण इमारत सुधारणा या विकासकामांचा ५ कोटी ३५ लाख रुपयांच्या विकासकामाच्या उद्घाटन व भूमिपूजन सोहळा आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पार पडला. या वेळी शिरूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्य कुसूम मांढरे, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, माजी पंचायत समिती सदस्या सविता दरेकर, दत्तात्रय हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, उपसरपंच ॲड. विजयराज दरेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, दत्तात्रय हरगुडे, सागर दरेकर, नवनाथ हरगुडे, अक्षय कानडे, राहुल हरगुडे, रामदास दरेकर, शशिकला सातपुते, स्नेहल भुजबळ, रुपाली दरेकर, संगीता हरगुडे, सुवर्णा दरेकर, ललिता दरेकर, दीपाली हरगुडे, प्रियंका दरेकर, ग्रामसेवक बाळनाथ पवणे, व ग्रामस्थ उपस्थितीत होते.
पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आताच्या सहा लेनसह १८ लेनच्या तीन मजली उड्डाणपुलाच्या कामाचीही लवकरच सुरुवात होईल असे सांगितले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समितीचे सभापती मोनिका हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, सुवर्णा दरेकर दत्तात्रय हरगुडे, रमेश सातपुते यांनी अभ्यासपूर्ण भाषण करत उपस्थितांची मने जिंकली. या वेळी स्वागत सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर यांनी केले, तर उपसरपंच ॲड. विजयराज दरेकर यांनी प्रात्सविक केले. आभार शशिकला रमेश सातपुते यांनी मानले.
गावासाठी अजून एक पाण्याची टाकी, नागरिकांच्या आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व सणसवाडी चौकात स्वागत कमानसाठी सहकार्य करण्याची मागणी सरपंच तथा सरपंच परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुनीता दरेकर यांनी केली.
जागा मिळाल्या तर आरोग्य केंद्र व पाण्याची टाकी उभारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. पीएमआरडी चुकीच्या रस्त्याबाबत व इतर झोनबाबत पाठपुरावा करण्यास प्राधान्य देणार आहे. चुकीचे काम करणाऱ्यांवर कार्यवाही केली जाणार असल्याचा इशारा आमदार अशोक पवार यांनी दिला.
सणसवाडी ग्रामस्थ एकत्र येत सलग तीन पंचवार्षिक पंचायत समिती सदस्य निवडून आणत दोनवेळा उपसभापतिपद, तर एक सभापतिपद मिळविले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे तिकीट सणसवाडी गावाला द्या, आम्ही सर्वजण एकत्र येत जिल्हा परिषदेत गावचा सदस्य पाठवू, अशी मागणी ॲड. विजयराज दरेकर यांनी केली.
सणसवाडी येथील विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार अशोक पवार, सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्य कुसूम मांढरे ,सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
140921\20210911_122747-01.jpeg
सणसवाडी