सुरक्षिततेची भावना निर्माण करणार  : संदीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:02 PM2018-07-30T22:02:22+5:302018-07-30T22:07:24+5:30

नक्षलग्रस्त गडचिरोलीला पोस्टिंग मागून घेणारे पोलीस अधिकारी म्हणून संदीप पाटील यांची ख्याती आहे़.

Will make sense of security : Sandeep Patil | सुरक्षिततेची भावना निर्माण करणार  : संदीप पाटील

सुरक्षिततेची भावना निर्माण करणार  : संदीप पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देशंभरांहून अधिक गुंडांना तडीपार करणारे पोलीस अधिकारी म्हणून ओळखपुण्यात रुजू झाल्यानंतर पाटील यांचे ‘बुके नको बुक द्या’ असे आवाहन

पुणे : पुणे जिल्ह्यातील जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम केले जाणार आहे. औद्योगिक वसाहतील खंडणीखोरी, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही़. अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून सर्व जण आपल्याला भेटू शकतात, असे नवनियुक्त पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 
पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधिक्षक सुवेझ हक यांच्या जागी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांची नेमणूक करण्यात आली. पाटील यांनी हक यांच्याकडून रविवारी अधिक्षकपदाची सूत्रे स्विकारली. पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे हे पोलिसांचे काम आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हयातील औद्योगिक वसाहतीत गुंडगिरी, खंडणीखोरीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 
आपल्याला भेटण्यासाठी परवानगीची जरुरी असणार नाही़. अगदी ग्रामपंचायत सदस्यांपासून सर्व लोकप्रतिनिधी तसेच नागरिक आपल्याला भेटू शकतात, असे त्यांनी सांगितले़ 
गुन्हेगारी, खासगी सावकारी, खंडणीखोर, गुंडगिरी करणाऱ्या शंभरांहून अधिक गुंडांना तडीपार करणारे आणि मोका अंतर्गत कारवाई करणारे पोलीस अधिक्षक म्हणून सातारकरांमध्ये पाटील यांनी आपली ओळख निर्माण केली़. 
 पाटील यांनी जून २०१६ मध्ये सातारा जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारला होता. त्या अगोदर ते संवेदनशील असणाऱ्या गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. गडचिरोलीतून साताऱ्यात हजर होत असताना त्यांनी ‘बुके नको, बुक आणा’ असे सातारकरांना आवाहन केले होते.  जिल्हावासियांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले होते. जमा झालेली ही सर्व पुस्तके त्यांनी गडचिरोली येथील नागरिकांना पाठवून एक नवा पायंडा घातला. अशा प्रकारे त्यांनी पुस्तकप्रेमी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती.
नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोलीची पोस्टिंग मागून घेणारे पोलीस अधिकारी म्हणून संदीप पाटील यांची ख्याती आहे़. पाटील हे गडचिरोलीत जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम करत होते. मूळचे पोलिसी काम करत असतानाच या भागात ग्रंथालये सुरू केली. इथल्या भागातल्या विद्यार्थ्यांची बौद्धिक भूक भागावी, जगात इतरत्र काय सुरू आहे, याची माहिती त्यांना व्हावी आणि परिणामी हे युवक नक्षलवादापासून दूर राहावेत हा त्यामागचा उद्देश होता. त्यांच्या या उपक्रमाला लोकांना भरपूर प्रतिसाद दिला आहे़ पुण्यात रुजू झाल्यानंतरही त्यांनी ‘बुके नको बुक द्या’ असे आवाहन केले आहे़ 

Web Title: Will make sense of security : Sandeep Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.