एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची मुदतवाढ घेणार नाही - बी.पी. सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 04:01 AM2020-01-11T04:01:58+5:302020-01-11T04:02:04+5:30

माझा एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा काळ दोन महिन्यांत संपुष्टात येत आहे.

 Will not run for FTII presidency - BP Sing | एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची मुदतवाढ घेणार नाही - बी.पी. सिंग

एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची मुदतवाढ घेणार नाही - बी.पी. सिंग

Next

पुणे : माझा एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा काळ दोन महिन्यांत संपुष्टात येत आहे. संस्थेचे दोनदा अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. एफटीआयआयचा माजी विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन काम करता आले याचे समाधान आहे. पण आता बास झाले असे वाटते. अध्यक्षपदासाठी मुदतवाढ मिळाली, तरी घेणार नसल्याचे एफटीआयआयचे अध्यक्ष बी. पी. सिंग यांनी सांगितले.
जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, एफटीआयआय आणि एसआरएफटीआयआय च्या संयुक्त प्रवेश शुल्कासह वार्षिक शैक्षणिक शुल्कातील वाढीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सुरू केलेले उपोषण यापार्श्वभूमीवर बी. पी. सिंग यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला. ते म्हणाले, ‘एफटीआयआयमध्ये आमच्या काळातही विद्यार्थ्यांची आंदोलने व्हायची. अभिनय आणि दिग्दर्शन विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये भांडण व्हायची. दिग्दर्शनाच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अधिकतर स्थानिक असायचे. त्यांची भाषा चांगली असायची, त्यांची अभिव्यक्ती उत्तम होती. त्यामुळे त्यांचा वरचष्मा अधिक होता. त्यावेळची कारणे वेगळी होती. आताच्या काळात विद्यार्थी शुल्कवाढीविरोधात आंदोलन करीत आहेत. विद्यार्थी स्वत:साठी नव्हे, तर इतर विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत. म्हणून मी त्यांचा आदर करून त्यांच्याशी चर्चा केली. माझ्यापरीने मी प्रयत्न केले. जिथे विद्यार्थी आहेत, तिथे प्रश्न हे असतातच. ते चर्चेतूनच सोडविले गेले पाहिजेत.’
एफटीआयआयमध्ये ‘विजय तेंडुलकर राईटिंग अकादमी’ स्थापन करण्यात आली असून, यामध्ये केवळ लेखन शिकविले जाईल. आगामी काळात एका विद्यार्थ्याला सहा अभ्यासक्रम शिकविण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. सहा महिन्यात एक कॉम्पॅक्ट ‘फिल्म मेकर’ म्हणून तो बाहेर पडू शकेल, असेही सिंग यांनी सांगितले.

Web Title:  Will not run for FTII presidency - BP Sing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.