दुसऱ्याची भाकरी हिरावून घेणार नाही : भरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:10 AM2021-04-26T04:10:39+5:302021-04-26T04:10:39+5:30

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर मागील दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील विरोधी पक्षातील पदाधिकारी यांनी ...

Will not take away another's bread: to fill | दुसऱ्याची भाकरी हिरावून घेणार नाही : भरणे

दुसऱ्याची भाकरी हिरावून घेणार नाही : भरणे

Next

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर मागील दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील विरोधी पक्षातील पदाधिकारी यांनी कोणतीही माहिती न घेता, मोघम आरोपांचा सपाटा लावला असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक पदाधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्यातील विरोधी पक्ष राजकीय पोळी भाजत असल्याचे म्हंटले आहे. मागच्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री भरणे आढावा बैठका घेवून अनेक तालुक्यांच्या कोविड सेंटरचे कामे मार्गी लावण्याच्या कामात व्यस्त आहेत. त्याचा फायदा घेत विरोधक टीकेची झोड उठवत आहेत.

इंदापूर तालुक्यातील दुष्काळी बावीस गावातील शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यात चाललेल्या राजकीय घमासान बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेकडो शेतकरी म्हणत आहेत, ते पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. ते पाणी सोलापूर जिल्ह्याचे नसून, पुण्याच्या बाजूकडून घेतलेले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावणार असून, यामध्ये शेतकरी बांधवांचा फायदा आहे. राजकीय लोकांचा नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काही राजकीय पक्ष विरोध करीत आहेत ते शेतकऱ्यांचा विरोध करीत आहेत. त्यामुळे त्यांनी विरोध थांबवावा अन्यथा आम्हीही तीव्र विरोध करू असा इशारा इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

सोलापूरच्या नियोजित पाण्याचा एक थेंबही घेतला नाही

सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरणातून जे नियोजित पाणी आहे. त्यातील एक थेंबही पाणी इंदापूरसाठी घेतलेले नाही. विरोधक माझ्यावर उगाच आरोप करीत आहेत. विरोधकांचे आरोप सिद्ध झाल्यास मी मंत्रीपद नव्हे तर आमदारकीचाही राजीनामा देऊन, राजकीय संन्यास घेईल असे विरोधकांना राज्यमंत्री यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

सोलापूरच्या जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न

इंदापूर तालुक्यात विकास कामांचा धडाका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लावलेला आहे. त्यामध्ये इंदापूर तालुक्यातील लाकडी निंंबोडी उपसा सिंचन साठी अर्थसंकल्पामध्ये १२०० कोटी रुपयांची तरतूद केली. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील दुष्काळी गावे व अनेक गावातील मागील पंचवीस वर्षांपासून रखडलेले, शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील जवळपास ६५००० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आल्याने, विरोधक सोलापूरच्या जनतेमध्ये गैरसमज पसरवत आहेत. असा आरोप इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी केला आहे.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Web Title: Will not take away another's bread: to fill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.