चिंचवड-दापोडी मेट्रो मार्गासाठी पंतप्रधान मोदी येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:55+5:302021-06-27T04:08:55+5:30
पुणे : पिंपरी चिंचवड ते दापोडी या मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. १६ ...
पुणे : पिंपरी चिंचवड ते दापोडी या मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. १६ ऑगस्टचा मुहूर्त त्यासाठी निश्चित केला असल्याचे समजते.
महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला होता. मेट्रोचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाले असल्याने या प्राधान्य मार्गाचे उद्घाटन व्हावे असा विचार यामागे आहे. पंतप्रधान कार्यालयाने यासाठी प्राथमिक संमती दिल्याची माहिती आहे. कोरोना टाळेबंदी व त्यानंतरच्या निर्बंधांमुळे मेट्रो कामाची गती संथ झाली आहे. मेट्रोला पुन्हा उभारी मिळावी यासाठीच लोकार्पणाचा कार्यक्रम मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न आहे.
पिंपरी चिंचवड ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गातील चिंचवड ते दापोडी व वनाज ते गरवारे महाविद्यालय हे दोन मार्ग प्राधान्य मार्ग म्हणून घोषित करण्यात आले होते. यातील चिंचवड ते दापोडी मार्गाने बाजी मारली. संत तुकाराम नगर, फुगेवाडी या स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा मार्ग पंतप्रधानांच्या हस्ते सुरू करण्याचा प्रयत्न आहे.