PMP ची बससेवा आणखी सुधारणार? पुणे, पिंपरीतील ३६७ मार्गांचे पुनर्नियोजन करण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 08:33 PM2023-03-04T20:33:01+5:302023-03-04T20:35:02+5:30

सविस्तर अभ्यासानंतर काही मार्गांचे विस्तारीकरण आणि काही मार्गांवरील बसची संख्या अर्थात वारंवारिता वाढवली जाण्याची शक्यता आहे...

Will pmpml bus service improve further Re-planning of 367 routes in Pune, Pimpri is underway | PMP ची बससेवा आणखी सुधारणार? पुणे, पिंपरीतील ३६७ मार्गांचे पुनर्नियोजन करण्याचे काम सुरू

PMP ची बससेवा आणखी सुधारणार? पुणे, पिंपरीतील ३६७ मार्गांचे पुनर्नियोजन करण्याचे काम सुरू

googlenewsNext

पुणे : पीएमपीसाठी प्रवाशांची वाढती संख्या आणि सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारण्यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाने शहरातील सर्वच ३६७ मार्गांचे पुनर्नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी रोजचे उत्पन्न आणि दररोजची प्रवासी संख्या याचा आढावा घेण्यात येत आहे. सविस्तर अभ्यासानंतर काही मार्गांचे विस्तारीकरण आणि काही मार्गांवरील बसची संख्या अर्थात वारंवारिता वाढवली जाण्याची शक्यता आहे.

पीएमपीतर्फे पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच पीएमआरडीएच्या हद्दीत ३६७ मार्गांवर सेवा दिली जाते. यापूर्वी आयटीएमएस सेवा सुरू करण्यासाठी पीएमपीने साडेचार वर्षांपूर्वी सर्व मार्गांची आढावा घेऊन नियोजन केले होते. त्यानंतर प्रवाशांच्या मागणीनुसार नवीन मार्गांवर बससेवा सुरू केली होती. मात्र, संचलनात दिवसेंदिवस तोटा वाढत असल्याने पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी सर्व मार्गांचे पुनर्नियोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पीएमपीच्या वाहतूक विभागाने सर्व मार्गांच्या उत्पन्नाची आणि प्रवासी संख्येची माहिती घेऊन आतापर्यंत ३० टक्के मार्गांचे पुनर्नियोजन केले आहे.

यात प्रवाशांच्या मागणीनुसार नवीन २६ मार्ग सुरू करण्यात आले आहेत. तर प्रवाशांची संख्या कमी असलेल्या २३ मार्गांवरील सेवा बंद करण्यात आली आहे. उत्पन्न कमी असल्याने काही मार्गावरील सकाळी पावणेसहा पूर्वीच्या आणि रात्री साडेनऊनंतरच्या बसची वारंवारिता १० मिनिटांऐवजी ३० मिनिटांची करण्यात आली. त्यानंतर मागणी जात्त असलेल्या मार्गांवर या बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नियोजनाच्या अमंलबजावणीची प्रतीक्षा

गर्दीच्या वेळी प्रवाशांची मागणी जास्त असल्याने वारंवारिता वाढविण्यासाठी जनरल आणि ब्रोकन बसची संख्या २३२ वरून ३३४ करण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना बससाठी जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही. तसेच बीआरटी मार्गावरील बसची संख्या ७४६ वरून ७६२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएमपीच्या लांब पल्याच्या मार्गांवरील शेवटची फेरी व सकाळच्या सत्रातील पहिल्या फेरीच्या वेळी प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने प्रशासनाने ४३ बस मुक्कामी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएमपीच्या ठेकेदारांना जास्तीच्या किलोमीटरसाठी द्यावे लागणाऱ्या पैशांची बचत होणार आहे. मात्र, हे नियोजन सध्या कागदावर असले तरी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी कधी होणार याची प्रतीक्षा पुणेकर करत आहेत.

Web Title: Will pmpml bus service improve further Re-planning of 367 routes in Pune, Pimpri is underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.