सायकल ट्रॅकच्या सद्यस्थितीचा आढावा मागविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:15 AM2021-02-17T04:15:33+5:302021-02-17T04:15:33+5:30
पुणे : शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांमध्ये तयार करण्यात आलेल्या सायकल ट्रॅकचा वापर हा पथारी व्यवसायांकडूनच होत असून, अनेक ट्रॅकची ...
पुणे : शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांमध्ये तयार करण्यात आलेल्या सायकल ट्रॅकचा वापर हा पथारी व्यवसायांकडूनच होत असून, अनेक ट्रॅकची दुरवस्था झाली आहे़ यामुळे शहरात तयार करण्यात आलेल्या सर्व सायकल ट्रॅकची सद्यस्थितीचा आढावा स्थायी समितीकडून मागविण्यात आला आहे़
समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली़ दरम्यान मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरात आणखी एका ठिकाणी म्हणजेच पाषाण रस्त्यावर पुणे विद्यापीठ चौक ते एनसीएल गेटपर्यंत सायकल ट्रॅक उभारणीच्या १ कोटी ४० लाख रूपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे़
------------
५० मिडी बस खरेदी करणार
शहरातील अरूंद रस्त्यावरही सार्वजनिक वाहतुकीला नागरिकांना प्राधान्य देण्यासाठी पुणे महापालिकेने ५० मिडी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे़ २६ लाख ९५ हजार रूपये किंमतीची ही एक बस सीएनजीवर असून, एसी असणार आहे़ ५० बस खरेदीसाठी १३ कोटी ४७ लाख रूपये खर्च येणार आहे़ या बस खरेदीमुळे लवकरच पुणेकरांना १० रूपयांमध्ये बसप्रवासाची संधी मिळणार आहे़
-----------------------